दापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल; आयआयटी पवईने केलेल्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:40 AM2018-02-10T03:40:00+5:302018-02-10T03:40:16+5:30

गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे.

 Green signal from Dapodi to Nigdi BRT; Implementation of the suggestions given by IIT Poway | दापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल; आयआयटी पवईने केलेल्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी

दापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल; आयआयटी पवईने केलेल्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी

Next

पिंपरी : गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे. महिनाभरात हा मार्ग सुरू होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा जेएनएनयूआरएम योजनेत समावेश झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने बीआरटी मार्ग उभारण्याची योजना आखली. सुरुवातीला पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते भक्ती-शक्ती चौक असे नियोजन केले. कामेही सुरू झाली.
मार्गिका उभारण्यात आल्या. बसस्टॉपची कामे झाली. या एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सामान्यांसाठी स्वतंत्र लेन अशा एकूण तीन प्रकारची वाहतूक व्यवस्था असल्याने बीआरटी यशस्वी होणार नाही, असा सूर आळविण्यात आला. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाली.
दरम्यान, लेन तयार करूनही वापर होत नसल्याने त्या वेळी काँग्रेसने लेन इतर वाहतुकीसाठी खुल्या केल्या होत्या. तसेच तत्कालीन सदस्या सीमा
सावळे आणि आशा शेडगे यांनी विरोध केला होता. याचिकेवरील सुनावणीत सेफ्टी आॅडिट
करूनच मार्ग सुरू करावा,
तोपर्यंत न्यायालयाने या मार्गास ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यानंतर गेले १० वर्षे या मार्गाचे काम थांबले होते.
महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपाची सत्ता आली. श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सार्वजनिक वाहतूक स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तसेच सत्ता येताच आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा मार्ग केव्हाही सुरू करा; परंतु तोपर्यंत या मार्गिकेतून इतर वाहने सोडा, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा मार्ग खुला केला होता. सुरुवातीला भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी बीआरटीवरील उधळपट्टीच्या चौकशीची मागणी केली होती.
प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्यानंतर स्थायी समिती सभापतींनी बीआरटीस विरोध दर्शविला आहे. दोनशे कोटींचा निधी परत गेला तरी चालेल. कोणाही निरपराध्याचा जीव जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

सुरक्षेच्या उपाययोजना
१सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘आयआयटी पवईने केलेल्या सूचनांचा अहवाल २ फेब्रुवारीला मिळाला. त्यानुसार ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर कामापूर्वीची स्थिती आणि सूचनांनंतरची स्थिती असा अहवाल पाठविण्यात येणार आहे. तसेच न्यायालयातही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर सर्व पदाधिकाºयांनाही सुरक्षिततेची माहिती दिली जाणार आहे. सोईस्कर वेळेनुसार हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सर्वसाधारणपणे १५ दिवसांचा कालावधी यासाठी अपेक्षित आहे.’’

आयआयटी करणार तीन वर्षे पाहणी
२आयआटी पवईने पुढील तीन वर्षांसाठी सेवा
देण्याची तयारी दर्शविली आहे. दर सहा महिन्यांनी त्यांचे पथक पाहणी करणार आहे. निरीक्षण नोंदवून अहवाल देणार आहे. या संदर्भातील विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी २०० पीएमपी बस सज्ज आहेत. त्यांना आरएफआयडी आणि जीपीएस बसविण्यात आले आहेत.

आयआयटीच्या अहवालातील सूचना
३स्पीड ब्रेकरवरील गेलेले पट्ट पुन्हा मारावेत. चौक ते बस स्टॉपपर्यंत जाणाºया पादचारी मार्गावर साईन असावेत. मार्गिकेवरील तुटलेल्या वाकलेल्या लेन सरळ कराव्यात. रेलिंग व्यवस्थित आहे किंवा नाही, याची पाहणी करावी.


आयआयटी पवईच्या अहवालानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करूनच बीआरटी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. या मार्गिकेवर प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. आम्ही पाहणी केली होती. त्या वेळी प्रशासनास काही सूचना केल्या. त्यांची अंमलबजावणी करून या संदर्भातील म्हणणे न्यायालयात मांडण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतरच हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Web Title:  Green signal from Dapodi to Nigdi BRT; Implementation of the suggestions given by IIT Poway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.