माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:07 PM2018-01-23T18:07:39+5:302018-01-23T18:09:37+5:30

येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

The Gramsevak Penalties in Kamshet by not giving timely information | माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड

माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड

googlenewsNext
ठळक मुद्देकलम ७ (१) चे उल्लंघन केल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंडाचा आदेशअर्जदारास त्याने मागितलेली माहिती त्याला एक आठवड्यात विनामूल्य पाठवावी : रवींद्र जाधव

कामशेत : येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 
कामशेतमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज धावडे यांनी येथील ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता ती त्यांना तीस दिवसांत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही सात दिवसांच्या आत ग्रामसेवक मतकर यांना माहिती देण्याचे आदेश देऊन ही धावडे याना माहिती मिळाली नाही. तदनंतर त्यांनी राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे रितसर अर्ज केला असता त्यावर सुनावणी होऊन आयुक्त जाधव यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामसेवक बाळासाहेब मतकर यांच्या विरोधात अपिलार्थीला माहिती न पुरवून कलम ७ (१) चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार पाच हजार रुपयांचा दंडाचा आदेश देऊन तो त्यांच्या पगारातून कापून घ्यावा असे सांगितले. याशिवाय अर्जदारास त्याने मागितलेली माहिती त्याला एक आठवड्यात विनामूल्य पाठवावी.

Web Title: The Gramsevak Penalties in Kamshet by not giving timely information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.