हुसैनसागर एक्सप्रेसमध्ये सापडली सोन्याचा ऐवज असलेली बॅग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 08:59 PM2018-02-06T20:59:46+5:302018-02-06T21:00:28+5:30

लोणावळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हैदराबाद येथील एका तरुणांची हरविलेली प्रवासी बॅग व मधील सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा माल तरुणाच्या आईच्या सुपूर्त करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान लोणावळा रेल्वे स्थानकावर हुसैनसागर एक्सप्रेस मध्ये घडली होती.

The gold bag found in Hussainasagar express | हुसैनसागर एक्सप्रेसमध्ये सापडली सोन्याचा ऐवज असलेली बॅग 

हुसैनसागर एक्सप्रेसमध्ये सापडली सोन्याचा ऐवज असलेली बॅग 

Next

लोणावळा : लोणावळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हैदराबाद येथील एका तरुणांची हरविलेली प्रवासी बॅग व मधील सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा माल तरुणाच्या आईच्या सुपूर्त करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान लोणावळा रेल्वे स्थानकावर हुसैनसागर एक्सप्रेस मध्ये घडली होती.

मध्य रेल्वेच्या लोणावळा रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्पाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (५ फेब्रुवारी) नागरराज (वय-३६, रा. वृदांवनधाम कॉलनी, नालगुंडा, हैद्राबाद) हे  छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून हुसैनसागर एक्सप्रेसने हैदराबादला जात होते. मात्र सोमवारी सदर एक्सप्रेस दोन तासांनी उशीराने व नेहमीच्या प्लॅट फॉर्मवरून सुटण्याऐवजी दुसऱ्या प्लॅट फॉर्मवरून सुटली. यामुळे नागरराज यांनी यादरम्यान अवधानाने त्यांचे आरक्षण केलेल्या बुगी (डबा) ऐवजी दुसऱ्या बुगीत बसले. कालांतराने कल्याण येथून त्यांनी सदर बुगी सोडून त्यांच्या आरक्षण केलेल्या बुगीतील जागेवर बॅग न घेता गेले. कर्जत जवळ आल्यावर त्या डब्यातील प्रवाशांनी सदर बॅग कोणाची आहे. याबाबत प्रवाशांना विचारणा केली असता. बॅगसंदर्भात कोणीही होकार दिला नाही.

त्यानंतर प्रवाशांनी या बेवारस बॅगबाबत रेल्वेतील  तिकीट निरिक्षक यांना कल्पना दिली. संबंधित तिकीट निरीक्षक यांनी या घटनेची माहिती लोणावळा रेल्वे सुरक्षा बल व लोणावळा लोहमार्ग पोलिसांना दिली.  हुसैनसागर एक्सप्रेस लोणावळा स्थानकावर येताच लोणावळा रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी डबा नंबर एफ-८ मध्ये शिरून बॅगची तपासणी करत सदर बेवारस बॅगबाबत खात्री करून बॅग उघडण्यात आली. बॅगमध्ये मिळालेल्या डायरीवरून रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्पाल सिंग यांनी नागरराज यांच्याशी  लाल व काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगबाबत संपर्क साधला असता नागरराज यांनी सदर बॅग माझी असल्याचे सांगितले. तो पर्यंत नागरराज हे हैदराबादच्या जवळपास पोहचले होते.  

मी हैदराबाद येथे एका लग्न सोहळ्यानिमित्त आलो असून, सदर बॅग ही माझ्या आईकडे देण्यात यावी अशी विनंती नागगरराज यांनी रेल्वे पोलिसांना करत त्याने त्याच्या आईशी ठाण्याला संपर्क करून बॅग घेऊन जाण्यास सांगितले. मंगळवारी (आज) श्रीमती लक्ष्मी रामनाथ यांनी लोणावळ्यात आल्यावर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्पाल सिंग, विजय हुपेले, रवी उपाध्याय, ए.के.यादव यांनी सदर बॅग मुद्देमालासह त्यांना सुपूर्त केली. या बॅग मध्ये ३० ग्रॅमची सोन्याची चैन,  १७ व २० ग्रॅमचे दोन सोन्याचे नेकलेस असे एकूण एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने व इतर १० हजार रुपयांचा माल असा एक लाख ९० हजारांचा ऐवज होता. बॅग व बॅगमधील माल मिळाल्यानंतर श्रीमती लक्ष्मी रामनाथ पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

Web Title: The gold bag found in Hussainasagar express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.