मांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:44 PM2018-05-17T19:44:36+5:302018-05-17T20:19:35+5:30

तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडले. तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

four Squabble smuggler arrested by police | मांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात 

मांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात 

googlenewsNext
ठळक मुद्देतीन मांडूळ जप्त, चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल पालकांना आपल्या पाल्यांचा असा ‘पराक्रम ’ पाहून  अश्रू अनावर

वाकड : तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडून तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर अरुण राठोड (वय १९), बाबासाहेब वसंत राठोड (वय २१), भीमराव नरसप्पा जाधव (वय २२, रा. तिघेही काळाखडक झोपडपट्टी वाकड ), सागर चंद्रकांत घुगे (वय २२, रा रघुनंदन कायार्लायशेजारी, ताथवडे) या चौघांना पोलिसांनी मांडुळासह वाकड येथील मुंजोबा मंदिराच्या मागे अटक केली आहे. याबाबत महिती अशी वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत दिवसा घटफोडी,चोरी, वाहनचोरी व सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा यासाठी खाजगी वाहनाने गस्त घालत असताना पोलीस नाईक राजेश बारशिंगे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की मुंजोबा वसाहत येथील मुंजोबा मंदिरामागे मांडूळ नावाच्या सापाची विक्री करण्यास येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक हरीष माने व तपास पथकातील कर्मचारी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तीन इसम संशयितरित्या थांबल्याचे दिसले. तर यापैकी एकाच्या हातात पोते होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली व पोत्याची पाहणी केली असता त्यात तीन मांडूळ आढळून आली. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते  मांडूळ त्यांनी विकण्यासाठी आणल्याचे कबूल केले. 
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने, राजेश बरशिंगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, भैरोबा यादव, विजय गंभीरे, श्याम बाबा यांच्या पथकाने केली.
.....................
   मांडूळ वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अंतर्गत शेड्युल तीन मधील प्राणी आहे तो नामशेष होत असल्याने त्याचे जतन व्हावे म्हणुन तरतूद करण्यात आली आहे. मांडूळ सापाबाबत बरेच गैररसमज व अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहे. तसेच मांडूळ पैशांचा पाऊस पाडते.त्यानुसार या अंधश्रद्धेच्या जगतात लाखो रुपयांची किंमत मोजली जाते. अशा अनेक तस्करी टोळ्या सक्रिय आहेत. मध्यंतरी पोलिसांच्या कारवाई सत्रामूळे ह्या टोळ्या भूमिगत झाल्या होत्या. मात्र, हळूहळू ते आता तोंड वर काढून सक्रिय होत आहेत. अटक झालेली सर्व आरोपी सर्व सामान्य  गरीब कुटुंबातील आहे. तसेच त्यांचे पालकांना आपल्या पाल्यांचा असा ‘पराक्रम ’ पाहून  अश्रू अनावर झाले. 

Web Title: four Squabble smuggler arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.