पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत- मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; शिष्टमंडळाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:16 AM2018-02-16T04:16:18+5:302018-02-16T04:16:29+5:30

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. ‘‘पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरू आहे.

In the first phase, to the Metro Nigadi - the assurance of the Chief Minister; Visit of the delegation | पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत- मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; शिष्टमंडळाची भेट

पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत- मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; शिष्टमंडळाची भेट

Next

पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. ‘‘पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरू आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आळंदी दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी मेट्रोची पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत किती आवश्यकता आहे, पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, याची माहिती शिष्टमंडळाने दिली होती. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम जेवढ्या वेगात आहे. तेवढ्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पूर्ण केले जाईल. त्याविषयीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या वेळी आमदार महेश लांडगे व पीसीसीएफ संस्थेच्या वतीने तुषार शिंदे उपस्थित होते.

Web Title: In the first phase, to the Metro Nigadi - the assurance of the Chief Minister; Visit of the delegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.