निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:03 AM2018-02-12T05:03:44+5:302018-02-12T05:03:54+5:30

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

 Fasting to Metro till Nigdi | निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण

निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण

Next

पिंपरी : मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
लाक्षणिक उपोषणात पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ), पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाउंडेशन, भावसार व्हीजन ‘ई’ पिंपरी-चिंचवड, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल, संस्कार प्रतिष्ठान पुणे, कै. तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला.
नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय लंके, अमोल भोईटे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

Web Title:  Fasting to Metro till Nigdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.