सत्तांतरानंतरही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा, महापालिका कारभाराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:00 AM2018-02-24T02:00:29+5:302018-02-24T02:00:29+5:30

महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे

Even after the success of the 'good day', the year of municipal administration | सत्तांतरानंतरही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा, महापालिका कारभाराची वर्षपूर्ती

सत्तांतरानंतरही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा, महापालिका कारभाराची वर्षपूर्ती

Next

पिंपरी : महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर जाहीरनाम्यातील ‘अच्छे दिन येणार कधी?’ याची प्रतिक्षा कायम असल्याचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेची निवडणूक होऊन निकाल लागला. पंधरा वर्षे असणारी राष्टÑवादीची एकमुखी सत्ता नाकारून नागरिकांनी भाजपाला कौल दिला. त्यास वर्ष होत आहे. वर्षभराच्या कारभाराविषयी भाजपा समाधानी असून, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. विकास झाला असून, पारदर्शक कारभार व महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे सुविधांसह उपाययोजना करीत असल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर सत्ताधारी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी दिशाभूल केली. शास्तीकरात माफी, भ्रष्टाचार व भयमुक्त कारभाराचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

भाजपाने एका वर्षात शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. समाविष्ट गावांना निधी दिला आहे. वीस वर्षांत समाविष्ट गावांत जेवढी कामे झाली नव्हती, तेवढी आम्ही वर्षात केली आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. मेट्रोचे काम वेगात सुरू असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला चालना दिली.
स्मार्ट सिटीच्या कामांनाही गती आली आहे.
- नितीन काळजे, महापौरविकासाची वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पारदर्शक कारभार आणि चुकीची कामे, प्रथांना आळा घातला. आर्थिक शिस्त लावली. तसेच पालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळणार आहे. समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे. कोणत्याही विकासकामांना विरोध म्हणून काही लोक टीका करतात. ही भूमिका योग्य नाही.
- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजपासत्ताधारी भाजपची एक वर्षाची कारकीर्द भ्रमनिरास करणारी ठरली आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड त्यांनी तोडले आहेत. सत्ताधाºयांना नागरिकांचा विसर पडला आहे. ते मूलभूत सुविधा पुरवू शकले नाहीत. विकासकामे करण्यापेक्षा केवळ निविदा काढण्यावरच भर आहे. पारदर्शकतेचे आश्वासन हवेत विरले आहे. जुन्याच प्रकल्पाचे नारळ फोडण्यात धन्यता मानत आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत.
- योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेनाभाजपा केवळ घोषणा देणारा पक्ष ठरला आहे. वर्षभरात ते केवळ राष्ट्रवादीच्या प्रकल्पांचेच भूमिपूजन करीत आहेत. निवडणुकीत भाजपने केवळ घोषणा दिल्या. कृती मात्र शून्य आहे. भाजप एक वर्षात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. सत्ताधाºयांचे भ्रष्टाचाराचे धोरण कायम आहे. भाजप केवळ मार्केटिंग करण्यात पटाईत आहे. वर्षभरात त्यांनी एकही काम पूर्ण केले नाही.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्टÑवादीमहापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. वर्षभरात नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानली आहे. विकासाचे स्वप्न दाखविले ते पूर्ण करण्याऐवजी पाणी महाग करण्याचा घाट घातला जात आहे. ४७ कोटी वाचविल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग तेच वळवा पाणी पुरवठ्यावरील खर्चात. नागरिकांवर भार कशासाठी दिला जातो? हेच का अच्छे दिन? - सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Even after the success of the 'good day', the year of municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.