दापोडीत दोन हजार कोटी खर्चून निर्माण होणार सात हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:58 AM2019-01-07T00:58:50+5:302019-01-07T00:59:06+5:30

शहर सुधारणा समिती : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती

With an estimated cost of two thousand crores, seven thousand houses will be constructed | दापोडीत दोन हजार कोटी खर्चून निर्माण होणार सात हजार घरे

दापोडीत दोन हजार कोटी खर्चून निर्माण होणार सात हजार घरे

Next

पिंपरी : महापालिकेच्या वतीने दापोडीतील जयभीमनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. त्याकरिता ३६ इमारतींमध्ये एकूण ७ हजार १४३ सदनिका बांधण्याच्या सुधारित खर्चाच्या उपसूचनेला शहर सुधारणा समितीच्या सभेत मान्यता दिली आहे. यासाठी १ हजार ९५७ कोटी खर्च केले जाणार आहेत. यामध्ये जमीन मालकाकडून ही जमीन खरेदी केली जाणार असून, त्यासाठी २०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. अध्यक्षस्थानी सभापती सीमा चौगुले होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ७१ झोपडपट्ट्या असून, आतापर्यंत महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत ९ गृहप्रकल्प राबविले आहेत. प्रकल्प राबविण्या व्यतिरिक्त अन्य झोपडपटट्यांसाठी एम. एम. प्रोजेक्ट कन्सल्टंटने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सादर करून त्याचे सादरीकरण केले आहे. मात्र, महापालिका हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर क्लस्टरवाईज झोपडपट्ट्यांची विभागणी करून प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता अन्य झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता या सल्लागाराने सुमारे तीन हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. या सल्लागाराने क्लस्टर एकमध्ये भाटनगर पुनर्निर्माण प्रकल्प व क्लस्टर दोनमध्ये दापोडी येथील सिद्धार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. दुसऱ्या क्लस्टरमधील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन अहवाल सादर करण्याचा प्रस्तावासह १ हजार ९५७ कोटींच्या सुधारित खर्चाची उपसूचना मंजूर केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पातील लाभार्थ्यांचे तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेडमध्ये स्थलांतर केले जाणार असून, यादरम्यान त्यांना नागरी सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

अडीचशे चौरस फुटांचे घर मिळणार?
या प्रकल्पामध्ये लभार्थिंना २६९ चौ. फुटांची सदनिका दिली जाणार आहे. विक्रीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय त्या मोबदल्यात कोणताही टिडीआर दिला जाणार नाही. या प्रकल्पासाठी गुगल मॅपनुसार एकूण ६ हजार ६९३ झोपडपट्ट्या आढळल्या आहेत. तर विकसकाला एकूण ३६ गृहप्रकल्पांमधून ७ हजार १४३ सदनिका बांधण्याची परवानगी दिली आहे. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ २९६ चौ़ फूट असले, विक्रीसाठी ३०० ते ८०० चौ. फूट क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ९१० कोटी असून, सुधारित किंमत १ हजार ७५७ कोटी एवढी धरली आहे.

दृष्टिक्षेपात
४पुनर्वसन, पुनर्विकासाकरिता
- ८०० कोटी
४सुविधांकरिता- १६ कोटी
४तात्पुरता निवारा- २३ कोटी
४रहिवासी सदनिका- ७६० कोटी
४विक्रीसाठी सदनिका- ८१ कोटी
४मूलभूत सुविधा- ७७ कोटी
४जागा मालकाकडून
जमीन विकत घेणे- २०० कोटी
४एकूण प्रकल्प किंमत-
१९५७ कोटी

प्रकल्प बांधकाम खर्च
४पुनवसनाकरिताचा खर्च-
३३६० प्रति चौरस फूट चटईक्षेत्रावर
४पुनर्विकासाचा खर्च-
२१०० प्रति. चौरस फूट सुपर बील्टअप एरियावर
४विक्रीसाठीचा खर्च - ३५६० प्रति चौरस फूट चटईक्षेत्रावर
४विक्रीसाठीचा खर्च - २३०० प्रति. चौरस फूट सुपर बील्टअप क्षेत्रावर
 

Web Title: With an estimated cost of two thousand crores, seven thousand houses will be constructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.