घटस्फोट आईवडिलांचा, फरपट मुलांची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:09 AM2018-12-09T03:09:31+5:302018-12-09T03:09:49+5:30

पालकांच्या स्वतंत्र होण्याचा मुलांवर होतोय परिमाण

Divorce parents, children in full swing | घटस्फोट आईवडिलांचा, फरपट मुलांची

घटस्फोट आईवडिलांचा, फरपट मुलांची

googlenewsNext

- सनील गाडेकर 

पुुणे : घटस्फोट झाला म्हणजे संपलं सगळं. त्यानंतर दोघांनाही एकमेकांची बंधने राहत नाही. दोघांतील वादच मिटल्याने पुन्हा भांडणाचाही प्रश्न नाही. पण नात संपलं म्हणून त्यातील जबाबदारी कोणावर ढकलता येत नाही. त्यामुळे आत्तापर्यंत दुहेरी मार्गावर असलेल्या मुलांच्या आयुष्याच्या गाड्या अचानक ऐकेरी रस्त्यावर आल्याने त्यांची गडबड होत आहे.

वैवाहिक जीवनात निर्माण झालेला कलह कायमचा संपविण्यासाठी पती-पत्नी घटस्फोट घेतात. पण त्यांचा हा कलह मिटविण्याच्या प्रक्रियेत मुलांवर विपरीत परिमाण होत असल्याचे दिसते. घटस्फोट हा पती-पत्नीत होतो मुलांचा त्यांच्या आई-वडिलांशी नाही. त्यामुळे अचानक एकाची साथ सुटल्याने मुलांच्या मनात देखील कालवाकालव होत असून त्याचा त्यांचा वैयक्तिक जीवनावर विपरीत परिमाण होत असल्याचे विदारक चित्र काही घटस्फोटांच्या प्रकरणात पहायला मिळते. त्यात घटस्फोट घेणा-या दाम्पत्याची मानसिक आणि आर्थिंक स्थिती चांगली असेल तर मुलांवर होणा-या परिणामांची तिव्रता काहीशी कमी होते. मात्र त्या दोन्ही बाबी पुरेशा प्रमाणात नसेल तर काडीमोड झालेल्या जोडप्यांच्या मुलांची मोठी फरफड होत आहे. घटस्फोट झाल्यानंतर मुलांचा ताबा कोणाकडे असावा हा प्रश्न असतो. मुल लहान असतील तर काही प्रकरणांत ते आधीच ठरलेले असते. मात्र ती मोठी झालेली असतील तर त्यांच्या ताब्यावरून देखील मतभेद होतात. पालकांपैकी एकाकडे ही मूले कायमस्वरूपी राहायला जाणार असले तरी दुसरे पालकही त्या मुलासाठी महत्त्वाचे असते. म्हणूनच याबाबत निर्णय घेताना न्यायालयात योग्य विचार होतोच आणि त्यात मुलाचे हित हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो.

पालकांविषयी राग निर्माण होतो
घटस्फोटाचे कारण काय असावे, याविषयी मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. मात्र त्यांची उत्तरे त्यांना लगेच मिळत नाहीत. वेगळ राहत असल्याने ज्या पालकाबरोबर आपण राहत आहे त्याला कौटुंबिक कामांत मदत करावी लागते. त्यामुळे अचानक जास्त जबाबदारी आल्याने त्याचा या मुलांना राग येतो व त्यातून ते संबंधित पालकाचा तिरस्कार करू लागतात.
पालकांच्या अशा वागण्यामुळे बालपण हिरावले गेल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. या गोष्टींच्या त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला तर समाजातील सर्वच स्त्री-पुरुष वाईट आहेत, असे निष्कर्ष ते काढतात. त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

मुले वाईट मार्गाला जाण्याची शक्यता
मुलांचे जास्त प्रेम कोणावर आहे व सध्या ते कोणाकडे राहतात याचा त्यांच्या मनात परिणाम होतो. कधी-कधी ही मुले स्वत:ला खूप एकटी समजतात. त्यामुळे त्याचे शिक्षणात मन रमत नाही. तसेच ते कालांतराने मनमर्जी वागायला सुरुवात करतात. वाढत्या वयाच्या मुलांच्या स्वत:च्या समस्यांमध्ये आई-वडिलांच्या भांडणाची भर पडली, तर मूल वाईट मार्गाला जाण्याची शक्यता असते, असे अ‍ॅड. झाकीर मनियार यांनी सांगितले.

कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे दरवर्षी सुमारे ४ हजार खटले दाखल होतात. लग्नानंतर काही महिन्यांत, एखादे मूल असणारे किंवा अगदी लग्न होऊन १० ते १५ वर्ष झाल्यानंतरही दावा दाखल करणा-या दाम्पत्यांचा यात समावेश आहे.

जानत्या वयात डोळ््यांसमोर आई-वडिलांचे भांडण होत असल्याने आधीच ही मुले त्रस्त असतात. मुलांना पालकांच्या भांडणात मध्यस्ती करावी लागत असल्याने कमी वयातच त्यांना मोठ्यांची भूमिका बजावावी लागते. सततच्या भांडणांमुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

अनिश्चितता, असुरक्षितता, राग या सवार्मुळे त्यांच्या कोवळ्या मनांवर ताण येतो आहे. विभक्त होत असलेल्या जोडप्याला दोन मुल असतील तर त्यांची देखील या सर्वात ताडातुट होते. आपल्या भाऊ किंवा बहिणीबरोबर थांबण्याची इच्छा असताना मुलांच्या मनाचा विचार न करता, मुलांची वाटणी केली जात आहे.

Web Title: Divorce parents, children in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.