‘पीएमपी’साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:03 AM2017-10-17T03:03:50+5:302017-10-17T03:04:14+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे.

 The decision to purchase 800 buses for PMP, Chief Sabha approval: Pimpri Municipal corporation to raise Rs 160 crore | ‘पीएमपी’साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार  

‘पीएमपी’साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार  

Next

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. या विषयावर वादळी चर्चा झाली. पीएमपी पिंपरीला सावत्र वागणूक देत आहे, मग आपण निधी का द्यायचा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
महापालिका सर्वसाधारण सभेत पीएमपीएमएलसाठी आठशे नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी देण्याचा विषय चर्चेला आला. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या विषावर चर्चा झाली. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे पिंपरीतील कर्मचाºयावर अन्याय करीत आहेत. तसेच जुन्या बस
दिल्या जातात. पिंपरीतील कर्मचाºयांना पुण्यात काम देऊन पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे अनुदान देताना पिंपरी-चिंचवडवर अन्याय का केला जातो याचा जाब विचारायला हवा. आपण जर निधी देणार असू, तर सेवाही मिळायला हवी, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली.
या विषयावरील चर्चेत संदीप वाघेरे, दत्ता साने, माई ढोरे, पंकज भालेकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी सहभाग घेतला. पवार म्हणाले, ‘‘शहराला चांगली सुविधा मिळण्याची गरज आहे. आपल्या कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.’’

स्वतंत्र निविदा प्रक्रियेची आवश्यकता

पीएमपीएमएलतर्फे फायनान्स मेकॅनिझम पद्धतीने एकूण ८०० बस खरेदी करण्यात येणार आहेत. ही बस खरेदी स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबवून करणे आवश्यक असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या पत्राद्वारे कळविले आहे. या ८०० बस खरेदीसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, त्यात पुणे महापालिकेचा ६०, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. हा निधी त्वरित उपलब्ध करून दिल्यास खरेदीप्रक्रियेला तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण ४०० कोटी रुपयांच्या निधीपैकी ४० टक्क्यांच्या आर्थिक दायित्वानुसार १६० कोटी रुपये इतका निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला देण्यात येणार आहे.

Web Title:  The decision to purchase 800 buses for PMP, Chief Sabha approval: Pimpri Municipal corporation to raise Rs 160 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.