आठवडे बाजारामुळे डांगे चौकात कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:06 AM2018-12-18T03:06:55+5:302018-12-18T03:07:10+5:30

वाहतुकीचा खोळंबा : विक्रेत्यांच्या स्थलांतराबाबत महापालिका प्रशासन उदासीन, उपाययोजनेची मागणी

Dange Chowk blocked due to the market of Week | आठवडे बाजारामुळे डांगे चौकात कोंडी

आठवडे बाजारामुळे डांगे चौकात कोंडी

googlenewsNext

थेरगाव : अनेकदा बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे भर रस्त्यातील अनधिकृत वाहनतळ व अतिक्रमणांचा विळखा यामुळे डांगे चौक येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. रस्ता प्रशस्त असूनही आठवडे बाजारामुळे रविवारी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. दररोज येथे भाजीपाला विक्रेते आणि अन्य विक्रेत्यांनी रस्त्यातच बस्तान मांडलेले असते. त्यामुळे येथील वाहतूककोंडीत भरच पडत आहे. डांगे चौकात अनधिकृत भाजीमंडई सुरू झाली आहे. भर रस्त्यात ठाण मांडून विक्रेते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे कोंडी होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी या भाजी मंडईचे स्थलांतर आवश्यक आहे. मात्र त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे.

औद्योगिकीकरणामुळे वाढलेली रहदारी आणि परिसरातील आजूबाजूच्या गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या डांगे चौक येथे दर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी कायमच खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. त्यामुळे डांगे चौक येथे दर रविवारी मोठी वाहतूककोंडी पाहावयास मिळत आहे. डांगे चैकातील रस्ते हे अधिकृत पार्किंग आणि पथारी व्यावसायिकांसाठीच उभारले असल्याचा भास होऊ लागला आहे. दर रविवारी या बाजारामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीला वाहनचालक आणि येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भाजीमंडईचे स्थलांतर कधी होणार, असा प्रश्न नागरिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
डांगे चौक संपूर्ण अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. आयटी हब, शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे व शहरात जाणारा औंध रस्ता आणि एका दिशेला पिंपरी-चिंचवड नगरीकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळणवळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
येथे देशाच्या कानाकोपºयातून कामगार व अन्य आयटी अभियंते लाखोंच्या संख्येने दाखल झाल्याने कुठेही ये-जा करण्यासाठी डांगे चौक शिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची आणि माणसांची सर्वाधिक वर्दळ
येथे दिवसभर असते.
वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना अपेक्षित आहे.

दिवसभर असते वाहनांची वर्दळ
४डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. औंध-रावेत
आणि चिंचवड-हिंजवडी असा हा रोड आहे. हा रस्ता द्रुतगती मार्ग
आणि हिंजवडी आयटी पार्कला जात असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथील रस्ता प्रशस्त असूनही
वाहतूककोंडी होत आहे. त्यातच विक्रेत्यांनी रस्त्यावर बस्तान मांडल्याने यात भर पडत आहे.

चौक अतिक्रमणाच्या विळख्यात
४डांगे चौकातील चारही रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे, असे चित्र या ठिकाणी भासत आहे. मंडईचे स्थलांतर करू, असे आश्वासन दिले जाते; पण त्या दृष्टीने कोणीही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. आठवडे बाजाराला स्थानिक नागरिकांसह आजूबाजूच्या गावांतून नागरिक बाजार करण्यासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. व्यावसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध होत नसल्यामुळे रस्त्यावरच भाजीपाल्यांची विक्री करावी लागते. लवकरात लवकर मंडईचे स्थलांतर झाले तर वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

४वाहतूककोंडीला प्रवासी आणि वाहनचालक त्रासले आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. गेल्या वर्षी अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता-रोको आंदोलन केले होते. रविवारी येथे आठवडे बाजार भरविण्यात येऊ नये, अशा सूचना अधिकाºयांनी विक्रेत्यांना दिल्या होत्या. त्यानंतर काही आठवडे बाजार भरला नाही. मात्र पुन्हा काही दिवसांतच आठवडे बाजार राजरोसपणे रस्त्यावरच भरत आहे.
४रविवारी वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडे बाजारामुळे वाहतूककोंडीचा दिवसेंदिवस वाढता उच्चांक पाहण्यास मिळत आहे.
 

Web Title: Dange Chowk blocked due to the market of Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.