corporators son who tried to suicide died in hospital in pimpri | नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न
नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : नववीमध्ये नापास झाल्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. कौशिक राजू धर (वय १५, रा. आनंदा सोसायटी, थेरगाव) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

कौशिक हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांचा मुलगा आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कौशिक आकुर्डीतील एका शाळेत नववीमध्ये शिकत होता. तो नापास झाला होता. या नैराश्यातून त्याने ७ मार्चला राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Web Title: corporators son who tried to suicide died in hospital in pimpri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.