पालिकेत आता सीआरआर सेल, कंपन्यांकडून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:57 AM2017-12-05T06:57:15+5:302017-12-05T06:57:45+5:30

स्मार्ट सिटी कक्ष, सिटी ट्रान्सफॉर्मेशन आॅफिसनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कामकाज सुरू झाले आहे.

The corporation now proposes to build a school from CRR cell, companies | पालिकेत आता सीआरआर सेल, कंपन्यांकडून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव

पालिकेत आता सीआरआर सेल, कंपन्यांकडून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव

Next

पिंपरी : स्मार्ट सिटी कक्ष, सिटी ट्रान्सफॉर्मेशन आॅफिसनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कामकाज सुरू झाले आहे.
औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. याठिकाणी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्टÑीय कंपन्या आहेत. मात्र, त्यांचा निधी हा बाहेरील शहरात वापरला जातो. ही बाब लक्षात आल्यानंतर कामगार क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्या शहरातील निधी शहरातच वापरला जावा, शहरविकासात उद्योगांना सामावून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून सीएसआर सेलची स्थापना झाली आहे. त्यासाठी सन २०१७-१८ या अर्थसंकल्पात सीएसआर अ‍ॅक्टिव्हीटी या लेखाशीर्षाची नव्याने तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेने सदर सेलचे कामकाज पाहण्यासाठी विजय वावरे यांची या अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती ६ महिन्यांसाठी केली गेली आहे. त्यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभाग येथे असणार आहे. प्रत्यक्ष सीएसआर सेलचे कामकाज नुकतेच सुरू झाले आहे.

Web Title: The corporation now proposes to build a school from CRR cell, companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.