बुद्धिबळ स्पर्धा : जठार, लागू, राजे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:01 AM2017-12-31T04:01:13+5:302017-12-31T04:01:38+5:30

निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.

Chess Contest: Gothic, Applicable, Kings Leading | बुद्धिबळ स्पर्धा : जठार, लागू, राजे आघाडीवर

बुद्धिबळ स्पर्धा : जठार, लागू, राजे आघाडीवर

googlenewsNext

पिंपरी : निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, निगडी येथे ७, ९, ११, १३ आणि १७ वर्षे वायोगटात होत असलेल्या स्पर्धेत १५४ खेळाडू सहभागी झाले आहेत. ७ आणि ९ वर्षाखाली गटात सहा फेºया, ११ व १३ वर्षांखालील गटासाठी सात फेºया आणि १७ वर्षांखालील गटात पाच फेºया होणार आहेत. तिसºया फेरीअखेर १७ वर्षे गटात क्षितिज कर्ण आणि वेद मोने यांनी प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.
१३ वर्षाखालील गटात सर्वेश सावंत, अमोघ कुलकर्णी, रितेश शेलार, सोहम भोईर आणि श्री पाटील, ११ वर्षाखालील गटात एैश्वर्या अभ्यंकर, प्रणव बोगावत, ज्योतिरादित्य देशपांडे, ऋषभ जठार प्रत्येकी तीन गुणांसह आघाडीवर आहेत.
नऊ वर्षाखालील गटात अंशुल बसवंती, पूर्वा होले, मानस तिवारी, श्रावणी उंडाळे आणि सात वर्षाखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे प्रत्येकी तीन गुणांसह आघाडीवर आहेत.
तिसºया फेरीचे निकाल (कंसात गुण) : सात वर्षाखालील : रोहित लागू (३) वि. वि. सस्मित भिडे (२), अर्जुन राजे (३) वि.वि. हितांश जैन (२), अलौकिक सिन्हा (२) पराभूत वि. सोहम जठार (३), कुशाग्र जैन (२.५) वि. वि. अपेक्षा मारभळ (१.५), निरव चौगुले (२) वि. वि. अनीश रावते (१.५), अवनीश पटेल ( १) पराभूत वि. अभिराम अभ्यंकर (२), युवराज पटेल (२) वि. वि. कोमल गोरे (१), तनिष खांदवे (२) वि. वि. सोहम पाटील (१), ध्रुव मोडक (१) पराभूत वि. आर्यन राव (२), नोएमान पाचवडकर (२) वि. वि. अदित्य सक्सेना (१).
नऊ वर्षांखालील : अंशुल बसवंती ( ३) वि. वि. संस्कार कदम (२), आर्य पाटील (२) पराभूत वि. पूर्वा होले (३), मानस तिवारी (३) वि. वि. अवनीश देशपांडे (२), श्रावणी उंडाळे (३) वि.वि. आर्यन गांधी (१), शंतनू गायकवाड (२) वि. वि. दिपांशू लोखंडे (१), अनहिता जोशी (१) पराभूत वि. अनुष्का मानकर (२), ललितादित्याय्यनार नादार (२) वि. वि. अथर्व काळे (१), आभा कुलकर्णी (२) वि.वि. रिदिमा साळुंखे (१), इशान लागू ९१.५) बरोबरी वि. शार्दुल साळुंखे (१.५), अथर्व पाटील (०) पुढे चाल वि. जयम मारभळ (२).
११ वर्षाखालील : एैश्वर्या अभ्यंकर (३) वि. वि. प्रज्ञा ढमाळ (२), किमया भोळे (२) पराभूत वि. ऋषभ जठार (३), असीम गोडबोले (२) पराभूत वि. प्रणव भागवत (३), आयुष्यमान श्रीवास्तव (२) पराभूत वि. ज्योतिरादित्य देशपांडे (३), शौर्य हिर्लेकर (२.५) वि. वि. तेजस पाटील (२), अदित्य छाजेड (१) पराभूत वि. राजन विनोद (२.५), मयूरेश पांगवलेने (२) वि. वि. श्रीरंग जागिरदार (१), स्वानंद केळकर (१) पराभूत वि. अंकिता पासलकर (२), सुमेध पाटील (२) वि. वि. विश्वजित केणी (१), अदित्य कोरे (२) वि. वि. श्रीयश
राऊत (१).

१७ वर्षे गट : क्षितिज कर्ण, वेद मोने यांची संयुक्त आघाडी

१३ वर्षाखालील : सर्वेश सावंत (३) वि. वि. सिद्धार्थ लोखंडे (२), आर्यन महाजन (२) पराभूत वि. अमोघ कुलकर्णी (३), श्री पाटील (३) वि. वि. आयुष मारभळ (२), रितेश शेलार (३) वि. वि. ओंकार पासलकर (२).सोहम भोईर (३) वि. वि. सुमित पाटील (२), कुंज बंसल (२.५) वि. वि. आयुष भेगडे (१), राजवर्धन बागावडे (१) पराभूत वि. वि. हर्ष काळडोके (२.५), प्रज्ञा भंडारे (१) पराभूत वि. अवधूत जोशी (२), तन्मय कदम (१) पराभूत वि. प्रतीक बिक्कड (२), हिमांशू चौधरी (१) पराभूत वि. संस्कृती कदम (२).
१७ वर्षाखालील : क्षितिज कुंज (३) वि. वि.
तनुश्री तिवारी (२), वेद मोने (३) वि.वि. ओम
लामकाने (२), प्रेरणा पाटे (१), पराभूत वि. संस्कृती पाटील (२.५), श्रेयांश सिंगवी (२) बरोबरी वि. मानसी ठाणेकर (१.५), वैभव कदम (२) वि.वि. चिन्मय अमृतकर (१), अदित्य हारगे (१) पराभूत वि. प्रज्ञेश इंगोले (२), आदित ललवानी (०) पराभूत वि.
प्रतीक मेहता (२), सुदर्शन अय्यर (१) वि. वि. तनिष शहा (०), युवराज राठोड ( १) वि. वि. क्षितिज
करंजले (०).

Web Title: Chess Contest: Gothic, Applicable, Kings Leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.