चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:20 AM2018-07-22T03:20:11+5:302018-07-22T03:20:31+5:30

महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

Chapekar Smriti Museum; Freedom fight to unravel among thirty sculptures | चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा

चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा

Next

पिंपरी : महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यातून देशभरातील भारतीय संस्कृती, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे दोन हजार वर्षातील घटना आणि घडामोडींवर चिरंतन स्मृती जपणारे हे ६ मजली राष्ट्रीय संग्रहालय उभारणार आहे.
संग्रहालयाच्या तिसऱ्या मजल्यावर प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल़ यात राजा राममोहन राय यांच्यापासून महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायडर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्याबरोबर स्वामी परमहंस, विवेकानंद, योगी अरविंद यांच्याबरोबर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व चळवळींचा चरित्र इतिहास ठेवण्यात येईल.
संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावर सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समाज विज्ञान संशोधन विकास संस्था यांच्या मार्फत संपूर्ण देशभरातील क्रांतिकारकांची जन्मठिकाणे, स्मृतिस्थळे, गड, किल्ले या ऐतिहासिक ठिकाणांचे संकलन, इतिहास या ठिकाणी असे उपक्रम करण्यासंबंधी निवासी कार्यकर्त्यांचे अभ्यास केंद्र, ऐतिहासिक ग्रंथालय होणार आहे.
संग्रहालयाच्या पाचवा मजल्यावर ३५० आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सहावा मजल्यावर स्मारक समिती अन्य उपक्रम, रेकॉर्ड, रेकॉर्डिंग रूम, बैठक असणार आहे.

संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर ३० दगडी शिल्पांचा आकार ८ फूट बाय ६ फूट असतील. त्यामध्ये भगवान तथागत गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांनी समतेचा संदेश दिला आहे. यावर आधारित ३ शिल्पे असतील, आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे शिल्प असेल़ स्मारकाच्या मधोमध ४ शिल्पांमध्ये शिवचरित्र साकारले जाईल. उर्वरित भागात थोरले बाजीराव पेशवे, उमाजी नाईक, १८५७ स्वातंत्र्यसमर, लहुजी आणि वासुदेव बळवंत फडके ते सुभाषचंद्र बोस यांचे महानिर्वाणपर्यंत इ. प्रसंग शिल्पांकित करण्यात येतील.

दुसरा मजल्यावर भारतातील सर्व क्रांतिकारकांचा सचित्र इतिहास संकलित केला जाईल़ त्यामध्ये वनवासी क्रांतिकारक, भटके विमुक्तातील क्रांतिकारक, महिला क्रांतिकारक, क्रांतिकारकांची असे राज्यवार दालणे असतील. याच भागत एका दालनात भारतातील संतांचे कार्य सचित्रपणे दाखविण्यात येईल.

Web Title: Chapekar Smriti Museum; Freedom fight to unravel among thirty sculptures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.