brother murder in Malwadi, Talegaon Dabhade due to water leakage | घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून
घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून

ठळक मुद्देछपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. राजू नामदेव केदारी (वय ४५, रा. माळवाडी, अचानक नगर, ता. मावळ, जि. पुणे) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
राजू यांची पत्नी भारती राजू केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कैलास नामदेव केदारी व अमर कैलास केदारी (दोघेही राहणार अचानक नगर, माळवाडी) यांच्यावर भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कैलास केदारी यांच्या घराच्या पडवीच्या शेडचे पाणी मृत राजू यांच्या घराच्या भिंतीवर पडत असल्याने त्या दोघांमध्ये वाद होता. त्यांचाच राग मनात धरत शुक्रवारी रात्री कैलास केदारी व त्यांचा मुलगा अमर यांनी संगनमताने राजू केदारी हे घराच्या पत्र्यावर गेले असता तेथे लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी करुन त्यांचा खून केला.
याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत ल सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत. 

 


Web Title: brother murder in Malwadi, Talegaon Dabhade due to water leakage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.