बंडोबांना थंड करण्यासाठी सरसावले पक्षश्रेष्ठी, भाजपातील राजीनामानाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:19 AM2018-03-05T04:19:37+5:302018-03-05T04:19:37+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. राजीनामानाट्यही घडले. अध्यक्षपदाच्या बुधवारी होणाºया निवडणुकीत भोसरीकर कोणती भूमिका घेताहेत याकडे लक्ष लागले आहे.

 BJP's resignation has begun to cool, BJP's resignation | बंडोबांना थंड करण्यासाठी सरसावले पक्षश्रेष्ठी, भाजपातील राजीनामानाट्य

बंडोबांना थंड करण्यासाठी सरसावले पक्षश्रेष्ठी, भाजपातील राजीनामानाट्य

Next

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. राजीनामानाट्यही घडले. अध्यक्षपदाच्या बुधवारी होणाºया निवडणुकीत भोसरीकर कोणती भूमिका घेताहेत याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत बैठक घेणार आहेत. नाराजी दूर करून गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
आशिया खंडात श्रीमंत म्हणून लौकिक असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या आपल्या हातात असाव्यात यासाठी सत्ताधारी राष्टÑवादी काँग्रेसप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ‘शह-काटशहा’चे राजकारण पिंपरीत सुरू आहे. स्थायी समितीत अध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापैकी कोणाच्या समर्थकाची निवड होणार याबाबत उत्सुकता होती. भोसरी विधानसभेला अध्यक्षपद मिळणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. मात्र, अध्यक्षनिवडीत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली.

राजीनामा माघारी घेणार
भोसरीतील आमदारसमर्थक महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे खळबळ माजली होती. भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर असे वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. नाराजी दूर करण्यासाठी नेते सरसावले असून, त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांशी चर्चा केली. महापौर नितीन काळजे यांच्यासह अन्य सदस्यांचा राजीनामा मंजूर केला जाणार नसल्याचे समजते.

गायकवाडांवर शिक्कामोर्तब
माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची पत्नी ममता गायकवाड यांचा भाजपातर्फे अर्ज भरला. समर्थकांना डावलल्यामुळे आमदार महेश लांडगे यांचा गट प्रचंड नाराज झाला. त्यातूनच बंडखोरी होण्याची चिन्हे होती. आमदार समर्थकांनी राष्टÑवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांना पाठिंबाही जाहीर केला होता. मात्र, नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजपा नेते सरसावल्याने स्थायी समितीत भाजपाचे बहुमत असल्याने ममता गायकवाड यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.

Web Title:  BJP's resignation has begun to cool, BJP's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा