भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 01:09 PM2018-12-22T13:09:09+5:302018-12-22T13:09:41+5:30

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भाजपाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. काँग्रेसने चौकीदार ...

BJP will give Rafale's answer to front of people : vishwas pathak | भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

Next
ठळक मुद्देराफेलविषयी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भाजपाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. काँग्रेसने चौकीदार चोर है असे आंदोलन सुरू केले आहे. हे चुकीचे आहे,  विरोधकांनी जनतेसमोर पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असेल, राजकीय लाभासाठी ही टीका आहे. तर भाजपाही त्याचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार आहे, असे भाजपाचे पक्ष प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रकार सांगितले. 
राफेलविषयी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, या व्यवहारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सहभाग का नाही, रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार यासंदर्भात पाठक यांनी माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, प्रमोद निसळ, अमोल थोरात, संजीवनी पांडये, आर. एस. कुमार आदी उपस्थित होते.
पाठक म्हणाले, राफेल विमानाची निवड काँग्रेसच्या शासनानेच केली. पण कराराबाबत दोन्ही देशात एकमत होत नव्हते. कारण तेथे दलालीचा विषय निकाली निघत नव्हता.  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे स्वीकारली. तोपर्यंत विमान खरेदी प्रकरण काँग्रेसने बासनात गुंडाळून ठेवले होते. काँग्रेसने केलेला करार फ्रान्सच्या द-सॉल्ट एव्हिएशन कंपनीला मान्य नव्हता. त्यामुळे वादग्रस्त करार तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रद्द केला. पुढे विमान खरेदीचा सामंजस्य करार झाला. हा करार संपुर्ण देशासमोर आहे.  संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे. 
भारतातील हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाटयाने कमी होत असताना उच्च तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची देशाला गरज आहे. देशाला १५० विमानांची आवश्यकता आहे. सरकारने केलेल्या या करारात खूप मोठा फरक आहे. कुठलाही फरक लक्षात न घेता काँग्रेसवाले आणि त्यांचे गल्लीतले नेते केवळ किमतींच्या अनुषंगाने मोदींवर टीका करीत आहे. ही टीका म्हणजे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. विमान खरेदीच्या कराराची ही वस्तुस्थिती पाहता काँग्रेसने केलेले आरोप आणि टीका ही केवळ राजकीय लाभापोटी आणि राजकीय वातावरण गढूळ करण्याच्या उद्देशाने केली आहे.

Web Title: BJP will give Rafale's answer to front of people : vishwas pathak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.