भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 02:58 AM2018-09-20T02:58:13+5:302018-09-20T02:58:29+5:30

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला.

BJP-NCP combine; In the general meeting, allegations against each other | भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

Next

पिंपरी : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. लहान कुत्र्यांची पिले सोडण्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाही, याचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादीचे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी आपली पाळीव कुत्र्यांची पिले महापालिकेत आणली होती. ही बाब भाजपाच्या लक्षात आली. तसेच पिले सभागृहात घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. लहान पिलांवर अन्याय होत आहे, हा मुद्दा सभागृहात भाजपा नगरसेवकांनी लावून धरला.
स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, लहान पिल्लांना पिशवीत आणले. गुदमरून काही घडले तर त्याला जबाबदार कोण? हा प्रकार करणाºयांवर प्राणिमित्र कायद्यान्वये (पेटा) गुन्हा दाखल करायला हवा.’’ त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले,‘‘भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अधिकारी फोन उचलत नसतील तर गंभीर बाब आहे. सभागृहात कुत्रे आणण्यापर्यंतची वेळ का आली याचाही विचार करावा.’’
भाजपाच्या आशा शेंडगे म्हणाल्या,‘‘विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे. परंतु, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. मुक्या जनावरांवर अत्याचार होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई करायलाच हवी.’’ विकास डोळस म्हणाले, ‘‘विरोधकांनी प्रशासनावर राग काढायला हवा होता. मुक्या जनावरांवर अन्याय करू नये.’’
राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, ‘‘एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा बाता मारायच्या आणि दुसरीकडे हे शहर कुत्र्यांचे शहर बनवायचे हे चुकीचे आहे. आंदोलन केले नाही, तर प्रश्न सुटणार कसे.’’
नीता पाडाळे म्हणाल्या, ‘‘कुत्री, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुकरे शिरतात तरीदेखील त्यांचा बंदोबस्त केला
जात नाही. ’’

श्रद्धांजली वाहून सभा तहकूब
या दरम्यान राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. महापौर राहुल जाधव यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. सभा सुरू होताच सभागृहनेते एकनाथ पवार यांनी ९६ कुळी शेतकरी शब्द सभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची सूचना करत सभा २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले.

अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले,‘‘शहरात मोकाट कुत्री, डुकरांचा त्रास होत आहे. आंदोलनाची वेळ का येते, या मुद्यापासून दूर जाऊ नये, आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे. पिल्ले आणली म्हणून गुन्हे दाखल करणार असाल तर स्वाईन फ्लू, डेंगी, मलेरीयाने अनेक लोक दगावले. मोकाट कुत्र्यांमुळे अनेक जण जखमी झाले. यास कारणीभूत असणाºया अधिकाºयांवरही गुन्हे दाखल करायला हवेत.’’

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, महापौर, सभागृह नेत्यांच्या विनंतीनुसार आम्ही कुत्र्यांची पिल्ले सभागृहात आणली नाहीत. पिल्ले आणणाºयांवर गुन्हा दाखल करा असे म्हणणे गैर आहे. या वेळी सीमा सावळे आणि साने यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. मी ९६ कुळी शेतकरी, या विरोधी पक्षनेत्यांच्या शब्दावरून सावळे आक्रमक झाल्या.
भाजपाचे संदीप वाघेरे म्हणाले,‘‘शहर प्राणि संग्राहालय झाले आहे. डुकरे, कुत्री, भाकड जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.’’ नामदेव ढाके व उषा मुंडे यांनीही आंदोलनाचा निषेध केला.

Web Title: BJP-NCP combine; In the general meeting, allegations against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.