पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:33 PM2019-03-23T13:33:27+5:302019-03-23T13:41:35+5:30

युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.

BJP MLA Laxman Jagtap publish in photo with parth pawar | पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

googlenewsNext
ठळक मुद्देमावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप आहेत नाराज

पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार  पार्थ अजित पवार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची शिवजयंती निमित्त पिंपळे गुरवमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले. त्यामुळे जगताप यांचा पार्थला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. त्यात आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले. त्याचवेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप तेथे दाखल झाले. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. या दोघांमध्ये येथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


मावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप हे नाराज आहेत. जगताप मावळमधून तीव्र इच्छुक होते, त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही युतीची उमेदवारी मिळविण्यात बारणे यांनी बाजी मारली. नाराज झालेले जगताप व त्यांचा समर्थक गट बारणे यांना मदत करणार नाही. यामध्ये आज पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चचेर्ला तोंड फुटले आहे.
यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे,  नगरसेवकही उपस्थित होते.
 

Web Title: BJP MLA Laxman Jagtap publish in photo with parth pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.