मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:58 AM2017-11-02T05:58:06+5:302017-11-02T05:58:13+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करण्याकडे मिळकतधारकांचा कल वाढत आहे. सुमारे ९५ हजार ६०० मिळकतधारकांनी आजअखेर आॅनलाइन भरणा केला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

Beneficiaries of online payment of income tax, and 43 percent of the citizens benefit from the facility | मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा

मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करण्याकडे मिळकतधारकांचा कल वाढत आहे. सुमारे ९५ हजार ६०० मिळकतधारकांनी आजअखेर आॅनलाइन भरणा केला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
मिळकत कर भरणाºयांसाठी पालिकेने आॅनलाइन भरणा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ३१ आॅक्टोबर अखेर महापालिकेत एकूण ४,६८,०३३ मिळकतधारकांपैकी दोन लाख चोवीस हजार मिळकतधारकांनी २७४.११ कोटी मिळकतकराचा भरणा झाला असून, तो मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ अखेर झालेल्या रक्कम रुपये २५९ कोटी मिळकत कर वसुलीपेक्षा १४.०९ कोटीने जास्त आहे. एकूण मिळकतधारकांपैकी ४३ टक्के नागरिकांनी आॅनलाइन सुविधेचा फायदा घेतला आहे.
मुदतीत मिळकतकराचा भरणा न केलेल्या मिळकतधारकांचे थकीत पहिल्या सहामाही अखेरच्या रक्कमेमधील मनपा करावर दरमहा दोन टक्के व शासन करावर वार्षिक दहा टक्के शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी दिनांक एक आॅक्टोबर २०१७ पासून सुरूकरण्यात आली आहे. पहिल्या सहामाही अखेरची सर्व करांची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरून मूळ करावर आकारण्यात येणाºया शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

अर्ज संकेतस्थळावर
ज्या मिळकतधारकांनी त्यांचे नवीन, वाढीव बांधकामाची करआकारणी करून घेतलेली नाही व ज्या मिळकतधारकांनी वापरात बदल केलेला आहे, अशा सर्व मिळकतधारकांनी संबंधित करसंकलन
विभागीय कार्यालयात अर्ज सादर करावा. हा अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Beneficiaries of online payment of income tax, and 43 percent of the citizens benefit from the facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन