आचारसंहिता जारी होताच फ्लेक्स काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:45 AM2019-03-12T02:45:20+5:302019-03-12T02:45:33+5:30

महापालिका प्रशासनाची कार्यवाही; संकेतस्थळावरील राजकीय छायाचित्रे गायब

Beginning of the flex as soon as the code of conduct is issued | आचारसंहिता जारी होताच फ्लेक्स काढण्यास सुरुवात

आचारसंहिता जारी होताच फ्लेक्स काढण्यास सुरुवात

Next

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच महापालिका परिसरातील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरात संस्थांची बैठक घेऊन फ्लेक्स काढण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सूचना केल्या आहेत. महापालिकेतील आचारसंहिता कक्षाच्या वतीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार परवाना विभागाच्या वतीने फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी जारी केल्यानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी चौथ्या मजल्यावरील दालनात आज बैठक घेतली. त्या वेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्यासह शहरातील जाहिरात संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी आचारसंहिता कालखंडात काय करावे किंवा काय करू नये, अशी माहिती दिली.

राजकीय फलक झाकले
दरम्यान, नगरसचिव कार्यालयाच्या वतीने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच काही पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे काढून टाकली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच महापालिकेतील १४ पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
आचारसंहिता जारी झाल्यानंतर २४ तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात होते. तसेच
राजकीय लोकांच्या वतीनेही शहरातील बहुतांश फ्लेक्स काढून घेण्याचे काम सुरू होते.
महापालिकेच्या संकेतस्थळावर महापौर राहुल जाधव, विविध पदाधिकारी यांची छायाचित्रे आहेत. राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी संगणक विभागाला केल्या होत्या त्यानुसार छायाचित्रे काढून टाकली आहे.

तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
शासकीय संपत्तीच्या विद्रूपीकरणावर निर्बंध येणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये आणि परिसरामधील कार्यालयीन इमारतींचा यात समावेश होतो. शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर आदी २४ तासांच्या आत काढून टाकण्यात येणार आहेत. शासकीय संपत्तीचे विद्रूपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर अशा जाहिराती काढून टाकाव्यात. सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बस, विजेचे खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या इमारतीवरील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून ४८ तासांच्या आत काढून टाकाव्यात. तसेच खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूक जाहीर झाल्यापासून ७२ तासांमध्ये काढून टाकाव्यात. त्यामुळे आचारसंहितेची कार्यवाही सुरू केल्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.

Web Title: Beginning of the flex as soon as the code of conduct is issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.