माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 04:45 PM2018-02-18T16:45:11+5:302018-02-18T16:45:16+5:30

माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला.

Although the nature of media changed, the role of journalism continued | माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

Next

पिंपरी  - माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. भोसरी येथील रामस्मृती कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे अधिवेशन घेण्यात आले, 
अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंढे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, अशोक सोनवणे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने तसेच चंद्रकांत झुरंगे आदी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे  म्हणाले, आर्थिक उद्देश ठेऊन काम करणारे २ टक्के  पत्रकार असतील, पण ९८ टक्के पत्रकार संवेदनशील आहेत.
पत्रकारांनी नकारात्मक राहू नये.
समाजमाध्यमामुळे बातमी लपून राहत नाही इतराकडून ती व्हायरल झल्यावर त्याची दखल घ्यावी लागते.त्यामुळे समाजमाध्यमे महत्वाची ठरू लागली आहेत. 
दै.जनशक्तीचे कार्यकारी संपादक पुरुषत्तोम सांगळे म्हणाले, वृत्तपत्र हे पुर्वी संपादकाच्या नावाने ओळखले जायचे पण आता मालकाच्या नावाने  ओळखली जातात. हा बदल दिसून येतो. आजची पत्रकारिता भरकटलेली आहे. असे बोलले जाते, पण पत्रकारांनी सकारात्मक रहावे.
वंसत मुंढे म्हणाले,सोशल मिडीयामुळे प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. माध्यमाच स्वरुप बदलेले असले तरी पत्रकारितेची भुमिका तिच आहे. प्रबोधन,समाजशिक्षण हीच पत्रकारितेची भूमिका कायम आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वर्तमानपत्राच्या मालिकाता स्तंभ होतोय का अशी परिस्थिती निर्माण होतय.माध्यामांच स्वरुप जरी बदलल असले तरी माध्यमांची भुमिका मात्र तीच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यात अनेक त्रुटी आहेत,पत्रकारांना सेवा निवृत्ती दिली पाहिजे समाजातील
दोन वर्ग अपेक्षित आहेत, त्यामध्ये शेतकरी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. त्यांचेच प्रश्न सरकारकडून सोडविले जात नाहीत.
पत्रकार आर्थिकदृष्या सक्षम असला पाहिजे. तरच तो पत्रकारिता करु शकतो. याचाही विचार झाला पाहिजे, शासनाने त्यांना पेन्शन दिली पाहिजे, 
स्वरुप बदलल तरी पत्रकारितेच भुमिका तिच राहणार फक्त सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाकडे  लक्ष दिले पाहिजे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, पत्रकारिता वेगवान झाली आहे. पत्रकाराच्या संरक्षणाबदल कडक कायदा व्हायला व्हावा. पत्रकारांना मुक्तपणे लिहिता यावे. त्यांच्यासाठी शासनाने संदर्भ  ग्रंथालय उपलब्ध करून द्यावेत.

Web Title: Although the nature of media changed, the role of journalism continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.