विघातक प्रवृत्तीवर करणार कारवाई- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:07 AM2018-03-03T01:07:21+5:302018-03-03T01:07:21+5:30

पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. 

Action to be done on a destructive tendency- Ramdas Athavale | विघातक प्रवृत्तीवर करणार कारवाई- रामदास आठवले

विघातक प्रवृत्तीवर करणार कारवाई- रामदास आठवले

Next

पिंपरी : पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. आरपीआय हा केवळ विशिष्ट समाजाचा पक्ष नसून त्यात अन्य समाजघटकांचा समावेश असावा, या भूमिकेतून सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आरपीआय शहर शाखेच्या वतीने पिंपरी येथे गुरुवारी सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणी दोषी असणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण द्यावे, ब्राह्मण, मुस्लिम व अन्य समाजालाही आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. भाजपाबरोबर जाणे उचित ठरेल, असे यापूर्वी ज्यांना वाटायचे, त्यांना आता मी भाजपात असल्याने पोटशूळ उठले आहे. ते टीका करू लागले आहेत. भारिपा बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी यावे, आम्ही ऐक्य करण्यास तयार आहोत. त्यांच्या मागे समाज आहे, आमच्या मागेही समाज आहे. चळवळीत काम करणारे आणखी काही आहेत, त्यांच्याही मागे समाज आहे. वरकरणी ऐक्य नको. आरपीआय हा पक्ष अन्य समाज घटकांचा समावेश केल्याशिवाय वाढू शकणार नाही.
या प्रसंगी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भागवत, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, रमेश चिमुरकर, तसेच वाहतूक आघाडीचे अजीज शेख, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, माजी नागरसेवक लक्ष्मण गायकवाड, पप्पू कागदे, सम्राट जकाते, के़ एम़ बुक्तर आदी उपस्थित होते.
राणे यांनी आरपीआयमध्ये यावे
माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे, अशी आॅफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल.
२०१९ मध्ये भाजपाच्या काही जागा घटतील, पण २५० पेक्षा कमी होणार नाहीत. एनडीए सत्तेत राहील, असे भाकीत त्यांनी केले. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यास आपण स्वत: पुढाकार घेणार आहे, तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
या वेळी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, पुण्याचे उपमहापौर चंद्रकांत धेंडे, तसेच आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते़

Web Title: Action to be done on a destructive tendency- Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.