Accident on Mumbai-Pune expressway; One seriously injured | चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; एक गंभीर जखमी

ठळक मुद्देअपघातग्रस्त वाहनातील एक जण गंभीर जखमी जावेद शेख (वय २४) व अक्षय राठोड (वय २१) अशी जखमींची नावे

कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बौर गावच्या हद्दीत पवना चौकीपुढे किलोमीटर नंबर ७३/७०० जवळ शनिवार दि. १३ रोजी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणारी आय २० कार (एमएच ०१ ५९१३) ही भरधाव कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या कार (एमएच १४ डी एन ७४७८) या कारला पाठीमागून धडक देऊन महामार्गाच्या किलोमीटर बोर्डला ठोकून रस्त्याच्या सुमारे पन्नास फूट बाहेर जाऊन पलटी झाली. 
या अपघातात अपघातग्रस्त वाहनातील एक जण गंभीर जखमी असून अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी संजय राक्षे, प्रकाश यादव, संतोष वाळुंजकर यांच्या मदतीने निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
आयआरबी पेट्रोलिंग कर्मचारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची नावे जावेद शेख (वय २४) व अक्षय राठोड (वय २१) अशी आहेत. दोघेही राहणार लोणावळा येथील असून यातील जावेद गंभीर जखमी आहे.


Web Title: Accident on Mumbai-Pune expressway; One seriously injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.