९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 07:31 PM2018-02-19T19:31:07+5:302018-02-19T19:31:40+5:30

शिवजयंतीचे औचित्य साधून चाकण एम.आय.डी.सी. तील स्पायसर इंडिया लिं., गॅब्रियल इंडिया लि., महाले बेहेेर इंडिया लिं. या तिनही कंपनीतील ९५o कामगारांनी स्वाभिमानी श्रमिक कामगार  सघटनेचे सभासदत्व स्वीकारले.

950 workers accepted membership of Swabhimani Workers Association | ९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व

९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व

Next

चाकण - शिवजयंतीचे औचित्य साधून चाकण एम.आय.डी.सी. तील स्पायसर इंडिया लिं., गॅब्रियल इंडिया लि., महाले बेहेेर इंडिया लिं. या तिनही कंपनीतील ९५o कामगारांनी स्वाभिमानी श्रमिक कामगार  सघटनेचे सभासदत्व स्वीकारले. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिनही कंपनीच्या प्रवेशद्वारा शेजारी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सघंटनेचे प्रमुख सल्लागार भोसरीचे आमदार पै. महेशदादा लाडंगे, सघटनेचे सल्लागार पै. रोहीदास गाडे, उद्योजक भाऊसाहेब तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
   या प्रसंगी आमदार महेशदादा लाडंगे यांनी कामगांराना मार्गदर्शन करताना सांगीतले की, तुम्ही सर्व कामगार स्वाभिमानी श्रमिक कामगार सघटनेच्या परिवारात आलात त्या बद्दल मी तुमचे स्वागत करतो. व येथुन पुढे कोणीही तुमच्यावरती अन्याय करनार नाही व कोणीही  तुमच्याकडे कान्याडोळयानी पाहाण्याची हिम्मत करनार नाही, संघटना नेहमी कामगारांच्या हीताचे निर्णय घेत असते. संघटनेचा कोणताही पदाधीकारी चुकीचे काम करनार नाही, याची खात्री या ठीकाणी मी देतो. सघंटनेचे अध्यक्ष जिवन येळवंडे यांनी सघंटनेची ध्येय धोरणे समजाऊन सांगीतली.
   याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, सरचिटनीस कृष्णा रोहोकले, अमृत चौधरी, रघुनाथ मोरे, तेजस बिरदवडे, प्रशांत पाडेकर, अमित पानसरे, महेश कुडपने, माजी सरपंच पाटील गवारे व कामगार मोठया संख्येने ऊपस्थित होते. कामगांरानी फटाक्याची आतषबाजी करून आनंद  व्यक्त केला. प्रास्तावीक कृष्णा रोहोकले यांनी केले व आभार अमृत चौधरी यांनी मानले.

Web Title: 950 workers accepted membership of Swabhimani Workers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.