रोपांच्या लागवडीसाठी ७७ लाख, उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच ठेकेदाराला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:10 AM2017-11-09T05:10:08+5:302017-11-09T05:10:28+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन हजार रोपांची लागवड केली जाणार असून, रोपांचा पुरवठा

77 lakhs for the cultivation of the seedlings, the work of the same contractor for the purpose | रोपांच्या लागवडीसाठी ७७ लाख, उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच ठेकेदाराला काम

रोपांच्या लागवडीसाठी ७७ लाख, उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच ठेकेदाराला काम

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन हजार रोपांची लागवड केली जाणार असून, रोपांचा पुरवठा करणा-या, लागवड करणाºया आणि वर्षभरासाठी देखभाल करणाºया ठेकेदाराला थेट पद्धतीने काम दिले जाणार आहे. त्यासाठी ७६ लाख ५९ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. या विषयीच्या प्रस्तावास स्थायी समितीत मान्यता दिली.
वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणे, त्यांची लागवड करून एक वर्ष देखभाल करणे याचे काम एका ठेकेदारास दिले आहे. त्यानुसार ठेकेदाराने तीन हजार मोठी रोपे पुरवून लागवड केली. देखभाल आणि संरक्षणाचे कामकाजही सुरू आहे. राज्य सरकारने चालू वर्षी चार कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्या अंतर्गत महापालिकेस ५० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यामधील ४३ हजार वृक्षांचे रोपण झाले आहे.
उद्दिष्टपूर्तीसाठी निधी
उद्दिष्ट पूर्ततेसाठी नव्याने वाढीव तीन हजार रोपांची आवश्यकता असल्याचे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. संबंधित निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा ६.१० टक्के कमी दराची होती. याच दराने ठेकेदार वाढीव तीन हजार रोपांचा पुरवठा, लागवड करण्यास तयार आहे. त्यामुळे
याच ठेकेदाराला पुन:प्रत्ययी आदेश द्यावा, त्यांना वर्षभराच्या कामकाजासाठी ७६ लाख ५९ हजार २८२ रुपये अदा करावेत. या प्रस्तावास प्रशासकीय, आर्थिक मान्यता द्यावी, अशी विनंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायीला केली आहे. त्यास मान्यता दिली.

अर्ध मॅरेथॉन स्पर्धेसाठी १८ लाखांचा खर्च
१महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेनंतर आता महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन महापौरांच्या प्रभागातच म्हणजे चºहोलीतच केले आहे. २६ नोव्हेंबरला ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी येणाºया १८ लाखांच्या खर्चाला आयत्या वेळी मान्यता दिली. ही स्पर्धा आठ गटांत होणार आहे. पुरुष आणि महिला गट (२१ किलोमीटर), १८ वर्षे मुले आणि मुली शालेय गट (सहा किलोमीटर), १६ वर्षे मुले आणि मुली (चार किलोमीटर), १४ वर्षे मुले आणि मुली शालेय गट (तीन किलोमीटर) अशी वर्गवारी आहे.
२दि. २६ रोजी सकाळी साडेसातला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चºहोलीगाव - मोशी - निगडी असा स्पर्धेचा मार्ग असेल. प्रत्येक गटातील प्रथम दहा क्रमांकांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम, पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आहे. यासाठी १८ लाखांच्या खर्चास मान्यता दिली.

Web Title: 77 lakhs for the cultivation of the seedlings, the work of the same contractor for the purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.