10th, XII test results are good; But think of the kids | दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय चांगला; पण मुलांचा विचार करा
दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय चांगला; पण मुलांचा विचार करा

पिंपरी : शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी एक मिनिट जरी उशीर झाला तरी परीक्षेस बसता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय योग्य असल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले; पण विद्यार्थ्यांच्या तत्कालीन परिस्थितीचाही विचार होणे गरजेचे आहे, असे सांगितले. पालकांनी मात्र या निर्णयाला विरोध केला. वाहतूककोंडीसारख्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला, तर विनाकारण विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पालकांनी केली आहे.

सध्याच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे गांभीर्य पहावयास मिळत नाही . या नियमामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करतील. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी या नियमाचा उपयोग होईल.येत्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावे लागणार असल्याने तो उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करेल. या निर्णयामुळे कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होईल. झटपट परीक्षा देऊन पळ काढणाºया आणि परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी, तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे.
- अतुल ओतारी, मुख्याध्यापक, श्रीपती बाबामहाराज माध्यमिक विद्यालयशालेय शिक्षण विभागाने नुकत्याच दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात जाहीर केलेल्या नव्या नियमांचे स्वागत करते. या नियमामुळे सातत्याने घडणाºया पेपरफुटीला आळा बसेल. काही विद्यार्थी त्यांना मिळालेल्या अतिरिक्त वेळेत गैरप्रकार करतात. या नियमांमुळे त्याला आळा बसेल विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत असणारी मानसिकता बदलण्यासाठी या नियमावलीचा निश्चित उपयोग होईल.केवळ काही वेळ परीक्षा दालनात बसून लगेच पळ काढणाºया विद्यार्थ्यांना चाप बसणार असून, परीक्षेसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत परीक्षा दालनाबाहेर न गेल्याने विद्यार्थी काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करेल.
- चैताली फाटक, प्राचार्या, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, गंगानगर, आकुर्डी

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षेबाबत घेतलेला निर्णय अयोग्य आहे. मुलांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, शाळेमध्ये परीक्षा नंबर शोधणे, वाहतूक कोंडीचा अडथळा यामुळे परीक्षार्थींना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.
- तानाजी मोरे, प्राचार्य, नृसिंह हायस्कूल, जुनी सांगवी

निर्णयामध्ये थोडीशी लवचिकता असावी. बºयाच वेळा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅफिक जाम,अपघात अशा घटनांमुळे उशीर होऊ शकतो.
- राजेंद्र पवार, मुख्याध्यापक, अभिनव माध्यमिक
विद्यालय, जाधववाडी

तळवडे येथे नियमितपणे होणारी वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्याला अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर होऊ शकतो, अपवादात्मक परिस्थितीत उशिर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळायला हवा.
- गोवर्धन चौधरी, मुख्याध्यापक राजा
शिवछत्रपती विद्यालय, तळवडे

बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत केले आहे. केंद्र संचालक व शाळेच्या दृष्टीने हा अतिशय चांगला निर्णय आहे. गैरप्रकाराला आळा बसेल. अर्धा तास परीक्षा केद्रांवर हजर राहणे हे बंधनकारकच असते.
- अन्सार शेख, प्राचार्य, म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी

शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेसंबंधी जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु त्यात थोडी सुधारणा आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी उशिरा आलाच, तर त्याला कारण स्पष्ट करण्याची संधी देण्यात यावी, तसे त्या विद्यार्थ्याकडून लेखी हमी घ्यावी. दुसºया दिवशीही उशिरा आला तर कारवाई करावी. या निर्णयाचा त्रास शहरी व ग्रामीण मुलांना होऊ शकतो. वेळेवर बस न मिळणे, वाहन बिघाड अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांबाबत प्रसंगानुसार निर्णय घेण्यात यावा. नाहीतर प्रामाणिक विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ शकते.
- ए. एस. कराडे, शिक्षक, पीसीएमसी स्कूल, बोपखेल

शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून, मात्र यात काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे बाजूने त्या त्या वेळी त्या विद्यार्थ्यांचे त्या वेळचे कारण व परिस्थिती लक्षात घेता निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याचे काही अतिशय अतिमहत्त्वाचे व ते सत्य परिस्थिती असेल तर त्याची माहिती केंद्रप्रमुख याने घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. तसेच पालकांनी आपल्या पाल्यास वेळेत परीक्षा ठिकाणी पाठवणे कर्तव्य असून, शासनाने विद्यर्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्णय असावा, पण तो जाचक नको.
- शिवाजीराव माने,
सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालय, सांगवी, पुणे

शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, यात अनेक त्रुटी आहेत, विद्यार्थी बस अथवा इतर वाहनाने परीक्षा देण्यासाठी येत असताना काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन उशिरा होतो. अथवा अति महत्त्वाचे कारण घडल्यास परंतु परीक्षा देणे गरजेचे असताना उशिरा आल्यास त्यावेळी निर्णय घेताना त्या विद्यार्थ्यांचे हित बघून निर्णय घेण्यात यावा. मात्र परीक्षा केंद्रात वेळेआधी पोहचणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सिग्नल, गर्दी, रस्ते आदी गोष्टी परीक्षा ठिकाणी पोहचण्यास जबाबदार असतात, त्यावर शासनाने विचार करावा. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा निर्णय घेऊ नये.
रमाकांत आरेकर,
पालक, नवी सांगवी

अचानकपणे अनपेक्षित गोष्टी घडल्या, तर विद्यार्थ्याला परीक्षेला येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे किमान दहा मिनिटे तरी विद्यार्थ्याला द्यायला हवीत. जर त्याला परीक्षेस बसू दिले नाही, तर विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ शकते.
- कुमार सोनटक्के, मुख्याध्यापक,
लक्ष्मीबाई धाइंजे माध्यमिक विद्यालय

दहावी-बारावीमध्ये असलेले विद्यार्थी पालकांवर अवलंबून असतात. अनेक विद्यार्थी स्वत: परीक्षा ठिकाणी येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा ठिकाणी जाऊन शासनाचा निर्णय अमलात आणावा.
- प्रभाकर हिंगे, पालक, दापोडी


Web Title: 10th, XII test results are good; But think of the kids
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

12 hours ago

सुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना दंड

सुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना दंड

12 hours ago

नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

17 hours ago

एकाच छताखाली दाेन हजारांहून अधिक मुलं, मुलींमध्ये करण्यात अाली मासिक पाळीबाबत जागरुकता

एकाच छताखाली दाेन हजारांहून अधिक मुलं, मुलींमध्ये करण्यात अाली मासिक पाळीबाबत जागरुकता

17 hours ago

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

1 day ago

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

1 day ago

प्रमोटेड बातम्या

पिंपरी -चिंचवड अधिक बातम्या

डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’

डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’

10 hours ago

बनावट सही, शिक्यांच्या आधारे बँक कर्जदारांची फसवणूक

बनावट सही, शिक्यांच्या आधारे बँक कर्जदारांची फसवणूक

17 hours ago

शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

1 day ago

मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेवर हेलिपॅड अन् औद्योगिक संग्रहालय

मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेवर हेलिपॅड अन् औद्योगिक संग्रहालय

1 day ago

पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

1 day ago

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून ; आरोपीची आत्महत्या 

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून ; आरोपीची आत्महत्या 

1 day ago