'डब्ल्यूडब्ल्यूई'मधील युवराज... जिंदर महलचा अविश्वसनीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:23 PM2019-07-19T17:23:53+5:302019-07-19T17:26:04+5:30

'डब्ल्यूडब्ल्यूई'नं गेली अनेक वर्ष भारतीयांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळेच या खेळाकडे अनेक भारतीयही आकर्षित झालेले पाहायला मिळाले आहेत. सध्या भारतीय वंशाचा एक खेळाडू डब्ल्यूडब्ल्यईमध्ये धुमाकूळ घालत आहे. जग त्याला जिंदर महल या नावाने ओळखते. पण त्यांच खरं नाव युवराज सिंह धेसी असं आहे आणि 19 जुलै 1986चा त्याचा जन्म अल्बेर्टा येथील कॅलगॅरी येथे झाला.

त्याने 2010मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पदार्पण केले होते. पुझच्याच वर्षी त्यानं मुख्य स्पर्धेत प्रवेश केला. पण, त्या 2014मध्ये करारमुक्त करण्यात आले होते आणि दोन वर्षांनंतर त्यानं पुन्हा कमबॅक केले. 1960 साली जिंदरचे कुटुंबीय कॅनडाला स्थायिक झाले.

कमबॅक केल्यानंतर त्यानं 3 मे 2017च्या लढतीर रँडी ऑर्टनला पराभूत करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. याचबरोबर त्यानं डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशीप जिंकले होते.

डब्ल्यूडब्ल्यूईच्या 50वा चॅम्पियन बनण्याचा मान महलने पटकावला आणि असा गौरव मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला. मात्र त्यानंतर त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

1980च्या दशकात जगभरात आपली छाप सोडणारे गामा कुस्तीपटू महलचे काका होते. पंजाबच्या या खेळाडूला 2011मध्ये डब्ल्यूडब्ल्यूमध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. डब्ल्यूडब्ल्यूईमधील त्याचा प्रवास हा चढउतारांचा राहिला आहे.