यंदा 31st ला मुंबईत ? मग इथं फिरायलाच हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 03:51 PM2018-12-31T15:51:53+5:302018-12-31T16:02:31+5:30

अॅडलॅब इमॅजिका हा भारतातील सर्वात मोठा थीम पार्क इव्हेंट आहे, तुम्ही 31st येथे जाऊन साजरा करू शकता.

नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अलिबाग हेही उत्तम ठिकाण आहे. निसर्गरम्य समुद्राच्या तिरी तुम्ही 31st चा मनमुराद आनंद घेऊ शकता.

नववर्षाच्या स्वागताला बॉलिवूडच्या टॉप डीजेसंग नाचायचंय तर Essel world बेस्ट पर्याय आहे.

गेट वे ऑफ इंडियाजवळ जाऊन बोटींगद्वारे नववर्षाचं स्वागत करण्यात वेगळीच मजाय, समुद्राच्या निळसर पाण्यात सरत्या वर्षाला निरोप द्या.

मुंबईत येणाऱ्यानं मरीन ड्राईव्हला फिरायलाच हवं, समुद्राच्या काठावर खळखळणारं ते पाणी पाहायलाच हवं.

समुद्राकाठी म्हटलं की कुठल्या बीचवर फिरायचं हा प्रश्न आलाच, मग बीचवर जायचंय तर पाली बीज एकदम झक्कास...

लोणावळ्यातील पवना लेकजवळ तुम्ही तंबू टाकून वन डे ट्रीपचं आयोजन करू शकता. नववर्षाचं स्वागत असही करता येईल.

हजार-बाराशे रुपयात एका व्यक्तीसाठी खायचं अन् राहायचं ठिकाणं म्हणजे प्रबलमाची निसर्गरम्य ठिकाण.

लोणावळ्यात जाऊन स्कायवाल्ट बलूनची सफारीही भन्नाट अनुभव राहिला. अविस्मरणीय असा तो क्षण राहिल.

तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुमच्या 31st हा निसर्गाच्या सानिध्यातच द मचन या इकोफ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये साजरा करता येईल.

टॅग्स :मुंबईMumbai