'हे' आहे जगातील सर्वात लहान आयलॅन्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:39 PM2018-07-12T12:39:39+5:302018-07-12T12:44:55+5:30

जगभरामध्ये अनेक आयलॅन्ड आहेत. त्यातील काही आयलॅन्ड असे आहेत की ते आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच एका आयलॅन्डची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचे क्षेत्रफळ इतके छोटे आहे की, तुम्ही ऐकून हैराण व्हाल.

न्यूयॉर्कच्या अलेक्झांड्रिया जवळ असलेले हे आयलॅन्ड जगातील सर्वात लहान बेट आहे. या आयलॅन्डचे नाव 'जस्ट रूम इनफ' आहे. या आयलॅन्डवर एक घर आणि एकच झाड आहे. आयलॅन्डचे क्षेत्रफळ फक्त 3,300 स्क्वेअर फीट आहे.

जगातील सर्वात लहान आयलॅन्ड असल्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

'जस्ट रूम इनफ' आयलॅन्डआधी बिशप रॉक हे जगातील सर्वात लहान आयलॅन्ड होते. परंतु याची जागा आता 'जस्ट रूम इनफ'ने घेतली असून याचे क्षेत्रफळ बिशप रॉकपेक्षा अर्धे आहे.

आधी हे आयलॅन्ड 'हब आयलॅन्ड' या नावाने ओळखले जात होते. परंतु, 1950 सालपासून हे आयलॅन्ड एक कुटुंबाने खरेदी केले. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी येथे एक छोटे घर बांधून एक झाड लावले. यांनीच या आयलॅन्डचे नाव बदलून 'जस्ट रूम इनफ' ठेवले.

या कुटुंबाने विकेन्डसाठी हे घर या आयलॅन्डवर बांधले होते. परंतु हे आयलॅन्ड पहाण्यासाठी अनेक पर्यटक येऊ लागले आणि या आयलॅन्डला एक वेगळी ओळख मिळाली.

टॅग्स :प्रवासTravel