विमान प्रवासादरम्यान लगेज हरवलं?, त्वरीत करा या 5 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 04:43 PM2018-06-19T16:43:00+5:302018-06-19T16:43:00+5:30

लेखी तक्रार द्या - लगेज बॅगेज बेल्टवर न दिसल्यास, त्वरीत याबाबतची तक्रार बॅगेज डिपार्टमेंटकडे करावी. येथे लेखी तक्रार द्यावी. जेणेकरुन हरवलेल्या बॅगचा शोध सुरू करण्यात येईल.

पीआयआर फॉर्म भरावा - हरवलेल्या सामानाची सूचना देण्यासाठी पीआयआर फॉर्म म्हणून प्रॉपर्टी इर्ग्युलेरिटी रिपोर्ट द्यावा लागतो. या फॉर्ममध्ये कोणकोणते सामान हरवले आहे, याची माहिती द्यावी लागते.

बॅगची संपूर्ण माहिती द्यावी, क्लेम टॅग हरवू नये - फॉर्म भरताना हरवलेल्या आपल्या बॅगसहीत एक-एक सामानाची माहिती नक्की द्यावी. या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात येते. शक्य असल्यास नेहमी बॅग भरल्यानंतर त्याचा एक फोटो काढण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच क्लेम टॅग तसंच पावती आपल्याजवळ नेहमी ठेवावी.

नुकसान भरपाईबाबतचे नियम जाणून घ्या - प्रत्येक एअरलाईन्सची नुकसान भरपाईची धोरणं वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, 24 तासांहून अधिक काळ उलटूनही बॅगेज न मिळाल्यास काही एअरलाईन्स कपडे खरेदी करण्यास मदत करते.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स नक्की काढावा - प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रवाशानं ट्रॅव्हल इन्श्युरन्स काढणं आवश्यक आहे. सामान हरवल्यास त्याची नुकसानभरपाई मिळते.

टॅग्स :प्रवासTravel