अदभूत रेस्टॉरंट! समुद्राच्या तळाशी जाऊन घेऊ शकता भोजनाचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:52 AM2019-03-29T08:52:11+5:302019-03-29T09:19:29+5:30

या जगात अजब गजब ठिकाणांची कमतरता नाही. त्यातील काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. असेच एक ठिकाण नॉर्वेमध्ये विकसित करण्यात आले आहे.

दक्षिण नॉर्वेमधील लिंडेस्नेस येथे 'अंडर' नाव असलेला एक रेस्टॉरंट उघडण्यात आला आहे. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे नावाप्रमाणेच हा रेस्टॉरंट अंडरवॉटर म्हणजे पाण्याखाली आहे. समुद्र तळाशी असलेला हा युरोपमधील पहिलाच रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी 100 जण भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात.

या रेस्टॉरंटमध्ये जेवताना तुम्ही सागरी प्राणीजीवनही पाहू शकता. तशी व्यवस्था इथे करण्यात आली आहे. त्यासाठी खास सागरी जीवशास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली आहे.

या रेस्टॉरंटच्या निर्मितीसाठी काँक्रिट आणि काचेचा वापर करण्यात आला आहे. मात्र भिंतींची रचना करताना त्यांना समुद्राच्या लाटांपासून नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

समुद्र तळाशी असलेला हा रेस्टॉरंट सुमारे 34 मीटर रुंद असून, 435 चौरस मीटर परिसरात पसरलेला आहे.

समूद्रसपाटीपासून पाच मीटर खोलीवर असलेल्या या रेस्टॉरंटच्या अंतर्गत भागातील रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.