ट्रेकिंगला जायचंय? मुंबईजवळच्या 'या' पाच किल्ल्यांचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 03:45 PM2018-07-07T15:45:56+5:302018-07-07T15:50:16+5:30

रायगड : शिवरायांच्या सहवासानं पावन झालेला हा किल्ला मुंबईपासून 170 किलोमीटरवर आहे. या ट्रेकसाठी तीन ते चार तास लागतात.

माहुली किल्ला: ठाण्यातील माहुली किल्लाजवळ पोहोचणं अतिशय सोपं आहे. मुंबईपासून 90 किलोमीटरवर असलेला हा किल्ला सर करायला 5 तास लागतात.

कलावंतीण दुर्ग: माथेरान आणि पनवेल यांच्या दरम्यान असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. या किल्ल्यावरुन आसपासच्या परिसराचं नयनरम्य दृश्य दिसतं. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 5 ते 6 तासांचा अवधी लागतो.

लोहगड : मुंबईजवळ असणारा लोहगडदेखील ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण आहे. हा किल्ला सर काढण्यासाठी 3 तास लागतात.

सुधागड : या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. या किल्ल्यावर भोराईदेवीचं मंदिर आहे. मुंबईपासून 109 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला सर करायला 4 ते 5 तास लागतात.