'ट्री हॉऊस'- उन्हाळ्यात पिकनिकला इथं जायला हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:51 PM2019-03-18T16:51:12+5:302019-03-18T16:58:25+5:30

व्हेथरी ट्री हाऊस - केरळमधील वायनाड येथे असलेलं निसर्गरम्य ट्री हाऊस. उन्हाळ्यात असा गर्द झाडी असलेल्या घरांत 4 महिन्यांसाठी राहायला जावं असंच कुणालाही वाटेल.

थेकड्डी ट्री रिसॉर्ट - झाडांच्या गर्द सावलीत राहायला कुणाला आवडत नाही. मायेची ऊब आणि झाडाची सावली माणसाला नेहमीच सुखावून जाते. मुदराईपासून 140 किमी अंतरावर हे ट्री रिसॉर्ट आहे.

द नेस्ट - कुर्ग - लाकडी बुंध्यांनी अन् दोरखंडाने उभारलेलं हे घर सौंदर्यतेचा आणि कलाकृतीचा उत्तम नमूना आहे. तुमचं मन, शरीर प्रसन्न ठेवणारा हा बंगला आहे. त्यामुळे म्हैसूरपासून केवळ 94 किमी अंतरावरील या द नेस्ट ट्री हाऊसला भेट द्यायलाच हवी.

द मचान लोणावळा - लोणावळ्यातील द मचान येथे ट्री हाऊस ही नैसर्गि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रप्रकाशासारखी शितल शांतता, पक्ष्यांचा हलिकासा किलबिलाट, मुंबईपासून केवळ 101 किमी अंतरावर हे ट्री हाऊस आहे.

नेचर झोन रिसॉर्ट मुन्नार - चहाच्या बागांच्या मध्यवर्ती असलेलं हे सौदर्याची खाण असणारं ट्री रिसॉर्ट लोभनीय आहे. उत्तम फर्निचर, बांबूच्या झाडांची लहानशी घरं, लक्षणीय आहेत. कोचीपासून 126 किमी अंतरावर हे रिसॉर्ट आहे.