...म्हणून पर्यटकांची पहिली पसंती ठरतं साउथ आफ्रिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:42 PM2019-05-31T15:42:09+5:302019-05-31T15:51:02+5:30

जगभरामध्ये आपण अॅडव्हेंचर्स आणि प्राकृतिक सौंदर्यासाठी दक्षिण आफ्रिका पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. येथील सौंदर्यामुळे पर्यटक या शहराकडे आकर्षित होत असतात. दक्षिण आफ्रीकेमध्ये येणारे पर्यटक आपला प्रवास केप टाउनपासून करतात. येथे तुम्हाला स्वच्छता आणि सौंदर्याचा अनोखा संगम पाहायला मिळतो. दक्षिण आफ्रिकेला इंद्रधनुष्यांच्या छटांचा देशही म्हटलं जातं. कारण येथे तुम्ही इंद्रधनुष्याला जवळून अनुभवू शकता. उत्तर आणि पश्चिम केपटाउन फुलांनी बहरलेलं पाहायचं असेल तर येथे फिरण्यासाठी वसंत ऋतू परफेक्ट सीझन आहे.

सिटी ऑफ गोल्डच्या नावाने प्रसिद्ध असलेलं जोहान्सबर्ग साउथ आफ्रिकेची कमर्शिअल राजधानी आहे. येथील सनसिटी विश्व पर्यटनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. वॉटर गार्डन, गोल्फ कोर्स, कॅसिनो हाल, मॅन मेड बीच, गॅम्बलिंग हाल आणि इंडियन फूडसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आकर्षणाचं केंद्र आहेत.