पक्षीप्रेमींसाठी 'ही' अभयारण्यं ठरतील खास पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 05:16 PM2018-07-23T17:16:14+5:302018-07-23T17:23:55+5:30

विविधतेने नटलेल्या भारतात प्राणी-पक्षांच्या अनेक प्रजाती आढळतात. देशात सात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहेत. ती अभयारण्य कोणती हे जाणून घेऊया.

राजस्थानमधील भरतपुर पक्षी अभयारण्य हे देशातील सर्वात प्रसिध्द पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात दुर्मिळ पक्षांच्या प्रजाती तसेच फुलांच्याही सुंदर प्रजाती पाहायला मिळतात.

गुजरातमध्ये नल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात पाण्यात राहणारे पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत.

म्हैसूरपासून सोळा किलोमीटर अंतरावर श्रीरंगपटनम रस्त्याच्या अगदी बाजूला रंगनथिट्टूचं पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात 170 हून अधिक दुर्मिळ पक्षांच्या प्रजाती आहेत.

ओडिशातील चिल्का हे पक्षी अभयारण्य अत्यंत सुंदर आहे. येथे शेकडो प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

गुरुग्राममधील सुलतानपुर पक्षी अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात स्थानिक पक्षांबरोबरच स्थलांतर करुन आलेल्या २५० पक्षांच्या प्रजाती आढळतात.

तमिळनाडूतील कांचीपुरम येथे वेदंथंगल पक्षी अभयारण्य आहे. दरवर्षी ठराविक ऋतुमध्ये येथे ४० हजाराहून अधिक स्थलांतरीत पक्षी येतात.

केरळमध्ये कुमारकोम पक्षी अभयारण्य आहे. १४ एकर परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात पक्षांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात.