'या' ११ देशामध्ये व्हिसाशिवायही जाऊ शकतात पर्यटक, इथे मिळते ई-व्हिसाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 12:09 PM2019-06-08T12:09:19+5:302019-06-08T12:24:34+5:30

कोणत्याही देशात फिरायला जाण्यासाठी टुरिस्ट व्हिसाची गरज असते. पण काही असेही देश आहेत जिथे अनेक देशांच्या नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजे ई-व्हिसाची सुविधा देतात. हा व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ फॉर्म भरावा लागेल आणि काही पैसेही द्यावे लागतील. चला जाणून घेऊ अशा देशांबाबत जिथे भारतीय नागरिकांना ई-व्हिसा सुविधा दिली जाते.

१) सिंगापूर - जगातल्या सर्वात महागड्या शहरांपैकी एक सिंगापूर आहे. इथे भारतीयांना त्वरित व्हिसा ऑन अरायव्हलही सुविधा दिली जाते. याचा फायदा घेऊन तुम्ही सिंगापूरमध्ये फिरायला जाऊ शकता.

२) व्हिएतनाम - जगातल्या सर्वात सुंदर देशांमध्ये व्हिएतनामचा समावेश आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची फार कमी फी मोजावी लागते. भारतीयांसाठी इथे ई-व्हिसाची सुविधा सुद्धाही उपलब्ध आहे. (Image Credit : Webjet Exclusives)

३) तुर्की - तुर्कीमध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. हे बघण्यासाठी तुम्हाला ई-व्हिसासाठी अर्ज करायचाय आणि पोहोचायचंय थेट तुर्कीला. (Image Credit : exzellenz-institut.com)

४) श्रीलंका - श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसासाठी फार झंझट करावी लागत नाही. येथील व्हिसा प्रक्रिया फार वेगवान आहे. तुम्हाला २० डॉलरमध्ये व्हिसा सहज मिळेल. (Image Credit : Traveller.com.au)

५) कंबोडिया - इतिहास, मंदिरे आणि वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेण्याची आवड असेल तर तुम्ही कंबोडियाला जाऊ शकता. तुम्ही केवळ ३० डॉलर देऊन इथे ई-व्हिसा मिळवू शकता.

६) ओमान - जुने आणि सुंदर समुद्री तट, शानदार डोंगर, दूरदूरपर्यंत पसरलेला वाळवंट अशी आकर्षक पर्यटन स्थळे इथे बघायला मिळतात. तुम्ही भारतीय असल्याचं प्रूफ दाखवून इथे ई-व्हिसा सहजपणे मिळवू शकता. (Image Credit : www.thoughtco.com)

७) म्यानमार - मान्यमारमध्येही तुम्ही अनेक गोष्टी बघू शकता. इथे एका डोंगरावर असलेली गोल्डन बुद्धाचं दर्शनही घेऊ शकता. इथे भारतीयांना ई-व्हिसाची सुविधा आहे. (Image Credit : REI.com)

८) मलेशिया - उंचच उंच इमारती असलेला मलेशियात तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. इथे फिरण्यासाठी तुम्ही ई-व्हिसासाठी अर्ज करू शकता. (Image Credit : www.travelfar.it)

९) जॉर्जिया - यूरोपिय देश जॉर्जिया त्या देशांपैकी एक आहे जिथे ई-व्हिसा मिळण्याची सुविधा आहे. इथे तुम्ही राफ्टिंग, स्कीइंगसारख्या अॅडव्हेंचरस स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. (Image Credit : www.worldatlas.com)

१०) अर्मेनिया - शानदार डोंगर आणि तेवढीच सुंदर संस्कृती असलेला देश म्हणजे अर्मेनिया. इथे तुम्हाला १०० वर्ष जुने स्मारकं बघायला मिळतील. इथे नुकतीच ई-व्हिसाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. (Image Credit : matadornetwork.com)

११) बहरीन - इथेही भारतीय नागरिकांना ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध आहे. (Image Credit : www.arabianbusiness.com)