ही आहेत लोकप्रिय Floating Restaurants...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 03:24 PM2018-09-10T15:24:21+5:302018-09-10T15:29:44+5:30

मुंबई : तुम्हाला फिरायला किंवा हॉटेलमधील पदार्थ खाण्यास आवडत असेल, तर तुमच्यासाठी काही फ्लोटिंग रेस्टॉरंट आहेत. वेगवेगळ्या डिशेस, बसण्याची उत्तम व्यवस्था याठिकाणची खासियत असते.

Veli Lake Floating Restaurant, Kerala : केरळमधील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुअंनतपुरमपासून आठ किलोमीटर अंतरावर एका नदीवर आहे.

Sea Palace, Amsterdam, Netherlands : युरोपमधील सर्वात पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट सी पॅलेस आहे. सी पॅलेस एक चायनीज रेस्टॉरंट आहे.

BBQ Donut Restaurant, Germany : जर्मनीतील बीबीक्यू डोनट रेस्टॉरंट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले हे फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे.

Cat Ba Bay Restaurant, Vietnam : व्हिएतनाम येथील कॅट बा बे रेस्टॉरंट जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे येथील सी फूडमुळे. या फ्लोटिंग रेस्टॉरंटला एखाद्या घरासारखे तयार करण्यात आले आहे.

Rustar Dhow Floating Restaurant, Dubai : दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात.

टॅग्स :अन्नfood