'हे' आहे संत व्हॅलेंटाइनचं गाव, ज्यांच्या आठवणीत साजरा केला जातो Valentine Day

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:14 PM2019-02-07T17:14:12+5:302019-02-07T17:22:46+5:30

येत्या १४ फेब्रुवारीला जगभरातील वेगेवगळ्या देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाइन डे हा संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत साजरा केला जातो. त्यांनी लोकांमध्ये प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला होता. याच कारणाने रोममध्ये तिसऱ्या शतकातील राज क्लॉडियसने फाशीची शिक्षा दिली होती. आज आम्ही तुम्हाला फ्रान्समधील व्हॅलेंटाइनच्या गावात घेऊन जाणार आहोत. या गावाला 'व्हिलेज ऑफ लव्ह' म्हणजेच प्रेमाचं गाव असं नाव देण्यात आलं आहे.

हे गाव लॉयर व्हॅलीमध्ये आहे. या गावाचं नाव आहे St. Valentine. जर तुम्हाला असं वाटत असेल की, पॅरिस हे जगातलं सर्वात रोमॅंटिक शहर आहे तर तुम्ही एकदा या गावात यायलाच हवं.

राजा क्लॉडियसचं मत होतं की, अविवाहित पुरुष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते आणि त्यांनी राजाच्या या आदेशाला विरोध दर्शवला होता. त्यांना अनेक सैंनिकांचे आणि अधिकाऱ्यांची लग्ने लावून दिली होती. पण त्यानंतर राजाने त्यांना १४ फेब्रुवारीच्या दिवशीच फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासूनच प्रिय लोकांना व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली.

हे गाव छोटं आहे पण निसर्गारम्य आणि मनमोहक आहे. या गावात १२ ते १४ फेब्रुवारीला उत्सवासारखं वातावरण असतं. या दिवसात या गावात सगळीकडे फक्त फूलं बघायला मिळतात. अशी मान्यता आहे की, या तीन दिवसात प्रेम व्यक्त केलं तर दगडही पिघळून हो म्हणेल.

या गावात एक लवर्स गार्डन आहे. या परिसरातील हे सर्वात रोमॅंटिक ठिकाण आहे. इथे एक छोटा तलाव असून काही सुंदर झाडेही आहेत. या झाडांखाली लव्हबर्ड्स बसलेले असतात. इथेच एक लोकल मार्केटही आहेत.

पूर्वी गार्डमधील झाडांवर लव लॉक लावण्याची प्रथा होती. या लॉकवर कपल्प एकमेकांचं नाव लिहित असत आणि चावी पाण्यात फेकत असत. पण आता हे बंद करण्यात आलं आहे. आता लोक येथील झाडांवर लव नोट्स लिहितात.

इथे एक झाड आहे या झाडाला 'ट्री ऑफ इटरनल हार्ट्स' म्हणजेच 'अनंत हृदयाचं झाड' असं म्हटलं जातं. कपल्स इथे येऊन झाडाची शपथ घेतात आणि पार्टनरसोबत इमानदार राहणार असं सांगतात. या झाडाजवळ अनेक कपल्स लग्नही करतात.