सलमानची अरुणाचलच्या रस्त्यावर सायकलिंग, नेत्यांनीही दिली साथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 02:19 PM2018-11-23T14:19:37+5:302018-11-23T14:37:49+5:30

अभिनेता सलमान खान याला तुम्ही अनेकदा मुंबईत सायकल चालवताना पाहिले असेल. आता पुन्हा त्याचे सायकल चालवतानाचे काही फोटो समोर आले आहेत. पण हे फोटो मुंबईतील नसून अरुणाचल प्रदेशातील आहेत.

अभिनेता सलमान खान याला अरुणाचल प्रदेशचा पर्यटनाचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनवलं गेलं आहे.

यावेळी त्याने केंद्रीय मंत्री किरन रिजीजू आणि अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह सायकल चालवताना दिसला.

यावेळी सलमान खान याला अरुणाचल प्रदेशाची पारंपारिक वेशभूषाही परिधान करवण्यात आली होती. त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.