जगभरातले चित्रविचित्र रेस्टॉरंट, इथे नर्स वाढतात जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 10:08 PM2019-05-17T22:08:09+5:302019-05-17T22:12:30+5:30

जगभरात असे अनेक अजब-गजब रेस्टॉरंट आहेत, ज्यात अनेक आश्चर्य लपलेली आहेत. ही रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध असून, इथे चित्र-विचित्र वस्तू मिळतात.

चीनमधल्या एका रेस्टॉरंटचा चेहरामोहराच तुरुंगासारखा आहे. तुरुंगात बसलेल्या कैद्यांप्रमाणे इथे जेवण करावं लागतं. हे विचित्र रेस्टॉरंट तियाजिन शहरात आहे. जे 2014मध्ये उघडलं आहे.

लाटवियाची राजधानी रिगामध्ये एक असं रेस्टॉरंट आहे, ज्याचं लूक एखाद्या रुग्णालयासारखाच आहे. इथले शेफ डॉक्टरच्या वेषात असतात. तर महिला वेटर्स नर्सचा ड्रेस परिधान करतात. इथे आलेले लोक एखाद्या रुग्णासारखे जेवण करतात.

तायवानच्या ताइपे शहरातील एक रेस्टॉरंट एका जहाजासारखं दिसतं. या रेस्टॉरंटचं नाव A380 ठेवण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर एखाद्या विमानात आल्यासारखाच भास होतो.

हॉलिवूडच्या ओपाक्य कॅफे नावाचं एक रेस्टॉरंट आहे, जिथे काळोखात जेवण दिलं जातं. विशेष म्हणजे इथले वेटर्सही नेत्रहीन असतात. अंधारात जेवण करण्याची एक वेगळीच मज्जा आहे. त्यामुळे इथे लोक जेवण करण्यासाठी आवर्जून येतात.

मॉस्कोतल्या एका रेस्टॉरंटमध्येही कामाला असलेले वेटर्स जुळे आहेत. जुळे वेटर्स पाहण्याच्या नादात इथे अनेक पर्यटक येतात. दिवसेंदिवस या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाढ होत आहे.