मुलांसोबत धमाल करायचीय? दिल्लीतील 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:57 PM2018-11-17T15:57:26+5:302018-11-18T21:46:18+5:30

दिवाळीची सुट्टी असल्याने सध्या लहान मुलांचा दंगा सुरू आहे. मुलांसोबत खूप धमाल करायचा तुमचा बेत असेल तर दिल्लीत अशी काही बेस्ट ठिकाणं आहेत. जिथे तुम्ही मजा करू शकता. अशाच काही दिल्लीतील ठिकाणांबाबत जाणून घेऊया.

लहान मुलांना खेळणी प्रचंड आवडतात. दिल्लीतील बहादुर शाह जफर मार्गावर नॅशनल डॉल म्युझियम आहे. या ठिकाणी 150 बाहुल्या आहेत. प्रसिद्ध कार्टूनिस्ट शंकर पिल्लई यांनी या म्युझियमची स्थापना केली.

दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये नॅशनल रेल म्युझियम आहे. 10 एकर परिसरात असलेल्या या म्युझियममध्ये आकर्षक ट्रेनचे मॉडल्स आहेत. तसेच चिमुकल्यांना रेल्वेच्या इतिहासाची माहिती मिळते.

दिल्लीमध्ये फन अॅन्ड फूड व्हिलेज आहे जिथे मुलं खूप जास्त मस्ती करू शकतात. दिल्लीतील या वॉटर पार्कमध्ये सर्वात मोठी वॉटर स्लाईड आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत.

नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात मेट्रो वॉक हे ठिकाण आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगवेगळे पाळणे आहेत. त्यामुळे लहान मुलांना या ठिकाणी खूपच मजा येईल.

दिल्लीमध्ये एक सुंदर चिल्ड्रन पार्क आहे. या चिल्ड्रन पार्कमध्ये अॅम्फीथिएटर, रोला स्लाईड आणि जंगल बुक थिएटर आहे. इंडिया गेटजवळ हे पार्क आहे.

टॅग्स :दिल्लीdelhi