Luxury कशाला म्हणतात, जाणून घेण्यासाठी 'या' १४ रिसॉर्ट्समध्ये राहून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:07 PM2019-06-20T15:07:42+5:302019-06-20T15:13:47+5:30

आजकाल लोकांना कसं सगळं Luxury पाहिजे असतं. मग त्या कोणत्याही वस्तू असू शकतात. विलासी जीवन प्रत्येकाची इच्छा असते. पण काही हॉटेल्सनी याची परिभाषाच बदलून टाकल्याचं दिसतं. ती कशी बदलली हे तुम्हाला या हॉटेल्सचे फोटो पाहूनच कळेल.

१) Over The Edge- Colorado - हे लक्झरी कॅबिन बर्फाळ डोंगरात तयार करण्यात आलं आहे. इथे तुम्हाला तीन वेगवेगळे मास्टर सूइट्स, पर्सनल थिएटर, पूल, स्पासारख्या सुविधा दिल्या जातात.

२) Morningside Ocean Estate- Vancouver Island - एक कॅबिन केवळ डोंगरात असू शकत नाही, तर समुद्र किनाऱ्यावरही असू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे Morningside Ocean Estate. याची बेडरूम १ हजार वर्ग मीटर फूट आहे. इथे तुम्ही नावेच्या मदतीने पाण्यास सैर करू शकता.

३) The Magical Moose- Tennessee - अमेरिकेच्या ग्रेट स्मोकी माउंटेन्सवर तयार केलेलं हे कॅबिन आउटडोर हॉलिडेसाठी परफेक्ट आहे. इथे तुम्ही Jacuzzi Tub मध्ये बसून डोंगरातील स्वच्छ हवेचा आनंद घेऊ शकता. या हॉटेलमध्ये एका फ्लोरहून दुसऱ्या फ्लोरला जाण्यासाठी लिफ्टही आहे.

४) Chalet Alphons- French Alps - Route des Chalet च्या डोंगरांमध्ये तयार केलेल्या Meribel चा फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. या कॅबिनच्या आजूबाजूला रेस्टॉरंट, बार आणि दुकाने आहेत.

५) Oaks Retreat- England - हे ठिकाण लाइफ पार्टनरसोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. इथून तुम्ही बाल्कनीतून बाहेरचा सुंदर नजारा बघू शकता. सोबतच हॉट बाथ टबमध्ये आंघोळ करण्याचा आनंदही घेऊ शकता.

६) Mountain Masterpiece- California - Ski Magazine ने या ठिकाणाला बेस्ट कॅबिन अवॉर्ड दिला आहे. हिवाळ्यात इथे सुट्टी घालवण्यात वेगळीच मजा येईल.

७) Galena Estate- Colorado - डोंगरांमध्ये असलेल्या या कॅबिनमध्ये पर्सनल किचन, बार, टीव्ही आणि डायनिंग एरिया आहे. १२ लोकांसाठी हॉट टब आणि एक चिमनी सुद्धा आहे.

८) In The Cloud- Utah - हे Utah चं बेस्ट Ski Resorts आहे. संगमरवर आणि महोगानीपासून तयार केलेलं हे रिसॉर्ट मनमोहक आहे. इथे एक शानदार झुंबरही आहे.

९) Poplar’s Edge- Virginia - भव्य असलं म्हणजेच लक्झुरिअस असतं असं नाही. Virginia च्या वाइन बेल्टमध्ये तयार या रिसॉर्टमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाईन ट्राय करू शकता.

१०) Two Wolves- Wyoming - Teton व्हिलेजमध्ये तयार केलेलं हे एक अद्भुत रिसॉर्ट आहे. इथे तुम्हाला गेम रूम, मास्टर बेडरूम, फायर प्लेस आणि प्रत्येक गरजेची वस्तू मिळते. आरामात सुट्टी घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

११) Chaletdorf Auszeit- Austria - ऑस्ट्रियाच्या या रिसॉर्टमधील इंटेरिअर फारच शानदार आहे. येथील स्वीमिंग पूल फारच प्रसिद्ध आहे.

१२) Snowmass Elegance- Colorado - हे कोलोराडोमधील बेस्ट रिसॉर्ट आहे. बेस्ट लॅंडस्केपसाठी या रिसॉर्टला ९ अवॉर्ड मिळाले आहेत.

१३) Eagles Nest- North Carolina - फॅमिलीसोबत सुट्टी घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. इथे तुम्हाला बास्केटबॉल कोर्ट, गेम रूम, पूल, वॉटर स्लाइड आणि एअर हॉकी खेळण्याची संधी मिळेल.

१४) Adobe Zen House- New Mexico - शांत वातावरणात एकट्याने सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. इथे तुम्हाला प्रोफेशनल किचन, डायनिंग एरिय आणि राहण्यासाठी मोठी जागा आहे.