मेघालय : अॅडव्हेंचरचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 03:17 PM2018-12-06T15:17:20+5:302018-12-06T15:34:21+5:30

ईशान्य भारतात वसलेले मेघालय हे राज्य सृष्टीसौंदर्याने नटलेले आहे. तुम्हाला जर अॅडव्हेंचरची आवड असेल तर मेघालय तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

मेघालयमध्ये नैसर्गिक गुहांची संख्या लक्षणीय आहे. येथे सुमारे 1700 हून अधिक गुहा आहे. अशा गुहांमध्ये फिरायला जाणे हा एक हटके अनुभव असतो. नोव्हेंबर ते मार्च हा या गुहांना भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

नेचर ट्रेकिंगपासून घनदाट जंगलांमधील भ्रमंतीपर्यंत मेघालयमध्ये तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे ट्रेकर्सना माहिती देण्यासाठी गाईडही उपलब्ध आहेत.

स्कूबा डायव्हिंग हे सर्वसामान्यपणे समुद्रात केले जाते. मात्र मेघालयमधील नद्यांमध्येही स्कूबा डायव्हिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

मेघालयमधील नद्यांमध्ये तुम्ही कयाकिंगचा आनंदही घेऊ शकता. कयाकिंगसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ आहे.

मेघालयमध्ये जिपलायनिंग अॅक्टिव्हिटीचा पर्यायही उपलब्ध आहे. येथे 2600 फूट लांब आणि 1200 फूट उंच जिपलायनिंगवरून शहराचा अप्रतिम नजारा दिसतो.

टॅग्स :पर्यटनtourism