White Beaches साठी प्रसिद्ध मालदीवच्या 'या' १५ गोष्टी वाचून तिथे जाण्यास व्हाल आतुर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:24 PM2019-06-10T12:24:40+5:302019-06-10T12:50:23+5:30

अनेक द्वीपांचा समूह असलेला मालदीव हा देश जगातलं सर्वात बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशनपैकी एक आहे. या देशात फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी अनेक गोष्टी आहेतच, सोबतच येथील संस्कृती, भाषा आणि राहणीमानही या देशाला इतर देशांपेक्षा वेगळं ठरवतो. मालदीवच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण आज आम्ही तुम्हाला आणखी काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्ही इथे जाण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. (Image Credit : www.easyvoyage.co.uk)

१) अंडरवॉटर कॅबिनेट मीटिंग - २००९ मध्ये इथे राष्ट्रपती मोहम्मद नसीर यांनी समुद्राखाली कॅबिनेट मीटिंग केली होती. याचा उद्देश जलवायु परिवर्तन आणि समुद्राच्या वाढत्या पातळीच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधणे हा होता.

२) सर्वात सपाट देश - मालदीव हा जगातला सर्वात सपाट देश आहे. या देशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची १.८ मीटर इतकी आहे. Villingili Island या देशातील सर्वात उंच पॉईंट आहे. याची उंची २.३ मीटर आहे. (Image Credit : www.holidify.com)

३) या देशाच्या संविधानुसार, केवळ मुस्लिमांनाच या देशाचा नागरिक म्हटला जाण्याचा अधिकार आहे. इतर धर्माच्या व्यक्तींना नाही. (Image Credit : Wikipedia)

४) भारतासोबत जुनं नातं - या द्वीपाचा शोध एका भारतीय राजकुमाराने २७० बीसी मध्ये लावला होता. इथे त्यांना निर्वासनासाठी पाठवण्यात आलं होतं. असे म्हणतात की, Soorudasaruna Adeettiya हे या द्वीपाचे पहिले राजा होते. (Image Credit : Booking.com)

५) वीकेंड - इथे शुक्रवारी आणि शनिवारी वीकेंडची सुट्टी दिली जाते. रविवारी येथील जास्तीत जास्त लोक काम करतात.

६) इस्लाम धर्म - या द्वीपाचा शोध एका भारतीय राजाने केला होता, पण 1153 A.D. मध्ये इस्लामला येथील अधिकृत धर्म घोषित केला गेला. इथे इस्लाम धर्माचं सख्तीने पालन केलं जातं. (Image Credit : www.opendoorsusa.org)

७) White Beaches - येथील समुद्र किनाऱ्यावरील वाळूचा रंग पांढरा आहे. अशी वाळू जगतल्या केवळ ५ टक्के समुद्र तटांवर आढळते. त्यामुळेच मालदीवची White Beaches अशी आहे. (Image Credit : susiefreemantravel.com)

८) नेहमी असतात ढग - मालदीवमध्ये कधी पाऊस होईल हे सांगता येत नाही. कारण इथे नेहमी ढगाळ वातावरण असतं. (Image Credit : YouTube)

९) जैव विविधता - येथील जैव विविधता फार समृद्ध आहे. इथे समुद्रातील कासवांच्या ७ प्रजातींपैकी ५ प्रजाती आढळतात. (Image Credit : holidify.com)

१०) सर्वात सुरक्षित हॉलीडे डेस्टिनेशन - मालदीव हे जगातल्या सर्वात सुरक्षित हॉलीडे डेस्टिनेशनपैकी एक आहे. (Image Credit : www.escape.com.au)

१२) २०३० पर्यंत समुद्रात बुडण्याचा धोका - हा द्वीप वेगाने पाण्यात बुडत आहे. एका अंदाजानुसार, जर लवकर काही उपाय केला गेला नाही तर २०३० पर्यंत हे ठिकाण समुद्राखाली जाईल. (Image Credit : www.rd.com)

१३) Dhonis - हे येथील पारंपारिक जहाज आहे. हे तुम्हाला इथे सहजपणे बघायला मिळेल. हे जहाज अरब शैलीने तयार केलं जातं. याचा वापर वाहतुकीसाठी आणि मासे पकडण्यासाठी केला जातो. (Image Credit : holidify.com)

१४) मालदीवमधील ११९० द्वीपांपैकी ११० व्दीप हे सरकारने केवळ पर्यटनासाठी सोडले आहेत. (Image Credit : www.kudadoo.com)

१५) मालदीवचं राष्ट्रीय वृक्ष नारळाचं झाड हे आहे. Dhoni हे जहाज याच झाडाच्या लाकडापासून तयार केलं जातं. (Image Credit : www.dermalog.com)