Here are five toy trains in India making your journey unforgettable
या आहेत तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवणाऱ्या भारतातील पाच टॉय ट्रेन By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 10:33 PM2018-12-01T22:33:53+5:302018-12-01T22:46:52+5:30Join usJoin usNext हिरव्यागार डोंगरदऱ्यातून धुरांच्या रेषा हवेत सोडत जाणाऱ्या झुकझुक गाडीतून प्रवास करणे कुणालाही आवडते. अशाच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि नयनरम्य परिसरातून जाणाऱ्या टॉय ट्रेन भारतात आहेत. निलगिरी माऊंटन रेल्वे - निलगिरी माऊंटन रेल्वे तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतामधील मेट्टुपालियम ते उटीदरम्यान धावते. ताशी अवघ्या 16 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचा भारतातील सर्वात संथ रेल्वे असा आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे - दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही न्यू जलपैगुडी ते दार्जिलिंग दरम्यान धावते. या रेल्वे मार्गाचा समावेश जागतिक वारशामध्ये करण्यात आला आहे. कालका-सिमला टॉय ट्रेन - बर्फाच्छादित पर्वतामधून जाणाऱ्या कालका-सिमला टॉय ट्रेनमधून प्रवास करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या रेल्वेमार्गाची सुरुवात 1903 साली झाली होती. नेरळ-माथेरान रेल्वे - महाराष्ट्रातील नेरळ येथून माथेरान या हिलस्टेशनपर्यंत जाणारी ही रेल्वेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या रेल्वेमार्गावर 21 पूल आणि 221 छोटीमोठी वळणे आहेत. कांग्रा व्हॅली रेल्वे - कांग्रा व्हॅली रेल्वेमार्गाचा भारतातील वारसास्थळामध्ये समावेश होतो. ही रेल्वे नॅरो गेज मार्गावरून पठाणकोट ते जोगिंदरनगरदरम्यान धावते. टॅग्स :भारतीय रेल्वेपर्यटनIndian Railwaytourism