गोवळकोंडा किल्ला! देशातील सर्वात मोठा आणि सुरक्षित किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:58 PM2019-05-16T13:58:39+5:302019-05-16T14:02:59+5:30

नवीन-जुन्या संस्कृतीचा संगम म्हणजे हैदराबाद शहर, निजामशाहीपासून हे शहर प्रसिद्ध आहे. येथील मुख्य शहरापासून काहीच अंतरावर आहे गोवळकोंडा किल्ला. हैदराबाद येथील या पर्यटनस्थळी भेट दिली नाहीतर तुमची हैदराबाद यात्रा पूर्ण होणार नाही.

गोवळकोंडा किल्ला देशातील सर्वात सुरक्षित किल्ल्यामध्ये गणला जातो. याठिकाणी प्राचीन काळात अरब आणि आफ्रिका देशातून हिरे आणि मोती यांचा व्यापार होत असे. जगातील प्रसिद्ध कोहिनुर हीरा याच ठिकाणी सापडला होता.

सुरुवातीच्या काळात याठिकाणी मातीचा किल्ला होता मात्र कुतुबशाहीच्या काळात या किल्ल्याला ग्रेनाइटपासून बनविण्यात आला. दख्खनच्या पठारावर बनलेला हा सर्वात मोठा किल्ला आहे. 400 फूट उंच डोंगरावर हा किल्ला बनविण्यात आला आहे. एकूण 87 बुरुज, 8 दरवाजे असं या किल्ल्यावर आहे.

हा किल्ला बघण्यासाठी तुम्हाला 15 रुपये दर आकारण्यात येतो. तर विदेशी पर्यटकांसाठी 200 रुपये प्रवेश फी आकारण्यात येते. कॅमेरा घेऊन जाणार असाल तर 25 रुपये अतिरिक्त दर आकारण्यात येतो.

सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 पर्यंत या किल्ल्याला भेट देता येईल. किल्ल्याची सुंदरता आणि आकर्षक कोरीव काम पाहायचं असेल तर सकाळच्या वेळी किल्ल्याला भेट द्यायला हवी.

देशातील प्रमुख शहरांपैकी हैदराबाद शहर असल्याने याठिकाणी येण्यासाठी कोणत्याही वाहतूक मार्गाचा वापर करता येईल. दिल्लीहून रेल्वेने हैदराबादला पोहचण्यासाठी 26 तास लागतात. तर मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी 14 तास लागतात.