श्रावणात 'या' ठिकाणी आवर्जून फिरायला जा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 03:20 PM2018-08-20T15:20:45+5:302018-08-20T15:36:23+5:30

गोवा हे कोणत्याही ऋतूमध्ये फिरायला जाण्यास बेस्टच आहे. त्यामुळे गोव्यात नेहमीच गर्दी असते.

पश्चिम बंगालमधलं दार्जिलिंगसुद्धा भारतातल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दार्जिलिंगमध्ये मोठ-मोठे असलेले चहाचे मळे सगळ्यांनाच आकर्षित करतात.

आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. श्रावणातून आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

पावसाळ्यात पुद्दुचेरीला फिरण्याची मजा काही औरच आहे. इथे परदेशातूनही पर्यटक येत असतात.

लेह लडाखमध्येही पावसाळ्यात वातावरण नयनरम्य असतं. पावसाळ्याच्या दिवसांत इथे फिरण्याची एक वेगळीच मजा असते. पँगांग लेकसारखी ठिकाणंही तुम्ही इथे पाहू शकता.