जयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:03 PM2019-01-21T16:03:43+5:302019-01-21T16:22:00+5:30

भारतात लिटरेचर फेस्टिव्हलला विशेष महत्त्व आहे. देशातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे फेस्टिव्हल साजरे केले जातात. लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्याची तसेच आनंद घेण्याची इच्छा असेल तर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल बेस्ट आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलबाबत जाणून घेऊया.

24 जानेवारीपासून जयपूरमध्ये हे फेस्टिव्हल सुरू होणार आहे. जगभरातील लोक या फेस्टिव्हलचा आनंद घेण्यासाठी तसेच अनेक साहित्यिक यामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. पाच दिवस असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये अनेक महान साहित्यिक येणार आहेत.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जगभरातील कारगीर आणि शिल्पकारांच्या सुंदर रचनांचं प्रदर्शन आयोजित करण्यात येते. दागिने, कपडे यासह नक्षीकाम, कलाकुसर केलेल्या अनेक सुंदर वस्तू पाहण्याची तसेच खरेदी करण्याची संधी मिळते.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध साहित्यिक हे सहभाग घेत असतात. त्यामुळे या साहित्यिकांचे लेखन वाचण्याची तसेच उत्कृष्ट वक्त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने अनेक साहित्यिकांना भेटता येतं.

खाण्याची आवड असलेले लोक जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला आवर्जून भेट देत असतात. शॉपिंगसह विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. राजस्थानमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये असतात.

राजस्थान टुरिजम अनेक कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. जवाहरलाल कला केंद्र आणि अंबर किल्ल्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जयपूरमध्ये येण्याचा बेत आखत असाल तर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा नक्की आनंद घ्या.